धरणे 95% भरली, नद्या नालेही ओव्हर फ्लो, सातारा जिल्ह्याला पावसाने झोडपले, VIDEO

Last Updated:

सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. मुसळधार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. मागील दोन महिन्यांपासून अनेक तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत असून जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता संपली आहे. त्यामुळे सर्वत्र पाणी वाहताना दिसत आहे.

+
सातारा

सातारा मुसळधार पाऊस

शुभम बोडके, प्रतिनिधी
सातारा : सातारा जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले. साताऱ्यासह जावल, महाबळेश्वर, कराड, वाई, पाटण तालुक्यात तालुक्यांनाही मुसळधार पाऊस झाला. यामुळे धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे कन्हेर, उरमोडी, बलकवडी, वीर, कोयना, धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नद्यांना पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
advertisement
सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. मुसळधार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. मागील दोन महिन्यांपासून अनेक तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत असून जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता संपली आहे. त्यामुळे सर्वत्र पाणी वाहताना दिसत आहे. ओंढे, नाले, नद्या, तलाव त्याचबरोबर धरणे तुडूंब भरून वाहत आहेत.
advertisement
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून प्रसिद्ध असलेले कोयना धरण 100 टीएमसी भरले आहे. त्यामुळे कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहाचे दोन युनीट सुरू करुन त्यातून 2000 विसर्ग नदीपात्रात करण्यात आला आहे. त्याचबरोबर सातारा तालुक्यातील कन्हेर धरणातून 7000 विसर्ग नदीपात्रात करण्यात आला आहे. त्यामुळे म्हसवे आणि अहमदाबाद या दोन्ही गावांचे नदीचे पूल पाण्याखाली गेले आहेत.
advertisement
मुंबईत याठिकाणी महिलांना मिळाला हंडी फोडण्याचा मान, मंदिराचा इतिहासही अनोखा, VIDEO
त्याचबरोबर उरमोडी धरणातून सांडवा वक्रद्वारातून 6213 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर विद्युत गृहातून 500 क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे उरमोडी धरणातून नदीपात्रात एकूण 6713 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. याचबरोबर वीर धरण विसर्ग 47 हजार 121 करण्यात आला आहे. या भागातील पावसाचे प्रमाण आणि तीव्रता लक्षात घेत निसर्गामध्ये बदल करण्यात येणार असल्याचे देखील कार्यकारी अभियंता नीरा उजवा कालवा विभाग फलटण यांनी सांगितले. त्याचबरोबर महाबळेश्वर तालुक्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जनजीवन ठप्प आहे. महाबळेश्वरमध्ये 112.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
धरणे 95% भरली, नद्या नालेही ओव्हर फ्लो, सातारा जिल्ह्याला पावसाने झोडपले, VIDEO
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement