Maharashtra Elections Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ,समोर आले चिंता वाढवणारे कारण...
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Maharashtra Elections Devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय सुरक्षा यंत्रणांनी घेतली.
नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय सुरक्षा यंत्रणांनी घेतली. देवेंद्र फडणवीस यांना सध्या Z प्लस सुरक्षा व्यवस्था आहे. आता, त्यातही वाढ करण्यात आली आहे. फडणवीस यांच्या सुरक्षा व्यवस्ंथेत आता फोर्स 1 चे चार अत्याधुनिक शस्त्रधारी कमांडे असणार आहेत.
ऐन निवडणुकीच्या धामधुमीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आल्याने चर्चांना उधाण आले आहे. विद्यमान उपमुख्यमंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना सध्या झेड प्लस सुरक्षा व्यवस्था आहे. पण, आता त्यात वाढ करण्यात आली आहे. फडणवीस यांच्या सुरक्षा व्यवस्थेतही वाढ करण्यात आली आहे. फडणवीस यांना असलेल्या धोक्यानंतर
advertisement
फडणवीस यांची सुरक्षा व्यवस्था कशी असणार?
देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा व्यवस्थेत सध्या फोर्स 1 मधील अत्याधुनिक शस्त्रधारी असलेले 4 कमांडो तैनात असणार आहे. एकूण 18 जवान एका वेळी सुरक्षेसाठी तैनात असणार आहेत. गनमॅनच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे.
फडणवीसांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ का?
एसआयडीच्या गोपनीय रिपोर्टमुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुरक्षा अलर्टवर आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या जीवाला धोका असल्याने ही सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
view commentsLocation :
Nagpur,Maharashtra
First Published :
Nov 01, 2024 12:21 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ,समोर आले चिंता वाढवणारे कारण...











