मी जिंकलो तेव्हा जोशी सर आणि ठाकरे CM झाले, मी यंदा हरलो म्हणून... शहाजीबापूंची फटकेबाजी
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
शहाजीबापू पाटील सोलापुरात बोलत होते. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद का मिळाले नाही, याची विनोदी शैलीत मांडणी केली.
सोलापूर : मी १९९५ साली निवडून आलो होतो तर शिवसेना नेते मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. मी २०१९ साली निवडून आलो तेव्हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. यंदा मी पराभूत झालो, जर मी निवडून आलो असतो तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते, अशी फटकेबाजी शहाजीबापू पाटील यांनी केली. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद का मिळाले नाही, याची विनोदी शैलीत शहाजीबापूंनी मांडणी केली.
शहाजीबापू पाटील सोलापुरात बोलत होते. जम्मू काश्मीर येथील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेले हल्ला, शरद पवार यांचे हल्ल्यावरील वक्तव्य, तानाजी सावंत यांचे पक्षीय राजकारणापासूनचे अंतर आदी विषयांवर शहाजीबापूंनी त्यांच्या शैलीत मते मांडली.
कारखाना आणि शिक्षण संस्थेच्या व्यापातून तानाजी सावंतांना वेळ मिळेना
तानाजी सावंत धाराशिवमधून आमदार आहेत, त्यामुळे सोलापुरातील बॅनरवर त्यांचा फोटो असण्याचा कोणताही निर्णय पक्ष पातळीवर झालेला नाही, असा टोला लगावून तानाजी सावंत हे मोठी शिक्षण संस्था चालवतात. त्यांच्याकडे पाच-सहा कारखाने झालेले आहेत. काही कारखाने त्यांना आणखी खरेदी करायचे आहेत. अशा व्यापात ते गुंतल्यामुळे पक्षकार्याकडे त्यांचे कमी लक्ष आहे, असे चिमटे त्यांनी काढले.
advertisement
तानाजी सावंत यांना मिळालेले मंत्रिपद आश्चर्यकारक
तसेच तानाजी सावंत यांना जे मंत्रिपद मिळाले, तेच आश्चर्यकारक होते कारण तळागाळातून जाणाऱ्या नेत्याला राजकारणातल्या प्रत्येक गोष्टी समजत असतात. तानाजी सावंत यांची एन्ट्री जशी अचानकपणे झाली अगदी त्याच पद्धतीने ते अचानक वर्तुळाच्या बाहेरही गेले, असेही शहाजीबापू म्हणाले.
शरद पवार आणि विजय वडेट्टीवार यांच्यावर बोलताना शहाजीबापू म्हणाले...
advertisement
शरद पवार आधी हल्ला प्रकरणी धर्माचा संबंध नसल्याचे बोलले होते. मात्र फडणवीसांनी त्यांना जाणीव करून दिल्यानंतर त्यांनी आपले शब्द बदलले आहेत. तसेच वडेट्टीवार जे बोलत आहेत ते विनाकारण विरोधाला विरोध करण्याचे काम करीत आहेत. वडेट्टीवारांनी हल्ल्यातील चित्रीकरण पहावे. या दहशतवाद्यांनी निवांतपणे निष्पाप लोकांना मारले आहे, असे शहाजीबापू पाटील म्हणाले.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
April 30, 2025 10:37 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मी जिंकलो तेव्हा जोशी सर आणि ठाकरे CM झाले, मी यंदा हरलो म्हणून... शहाजीबापूंची फटकेबाजी