Sharad Pawar : पळून गेल्यावर माझ्याकडे आले, म्हणाले चूक झाली, विधानसभेचे उपाध्यक्ष केले पण.... शरद पवारांनी झिरवाळांना मतदारसंघात जाऊन घेरले

Last Updated:

जो माणूस दोनदा पळून जातो त्याच्यावर भरोसा ठेवायचं काही कारण नाही. हा कुठे जाईल? काय करेल? याची काही खात्री देता येणार नाही, असा हल्ला शरद पवारांनी झिरवळांवर चढवला.

शरद पवारांनी झिरवळांवर चढवला हल्ला
शरद पवारांनी झिरवळांवर चढवला हल्ला
नाशिक : नरहरी झिरवळ याला आम्ही तिकीट दिलं, सत्तेत आणलं. त्याला महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष करण्याचं मीच सुचवल. पण ते पळून गेले. त्यानंतर आम्ही काही लोक गुडगावला पाठवली, तर हॉटेलात झिरवळ सिनेमा बघत होते, महाराष्ट्र विधानसभेचे काम सोडून हा ग्रस्त त्या ठिकाणी गुडगावला होता. तिथून परत पाठवलं सांगितले परत चूक होणार नाही म्हटलं काही हरकत नाही,असा किस्सा सांगत शरद पवारांनी नरहरी झिरवळांना घेरलं आहे.
राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनिता चारोसकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत शरद पवार बोलत होते. यावेळी शरद पवारांनी अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवळ आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला होता. यावेळी शरद पवार म्हणाले, इथं कोण आहे झिरवळ ना, त्याला टिकट आम्ही दिले, सत्तेत आम्हीच आणलं. ते महाराष्ट्राच्या निडणुकीत निवडून आल्यानंतर आमच्यासमोर प्रश्न होता विधानसभेचा उपाध्यक्ष कोणाला करायचं? मी त्यावेळी स्वत: सांगितलं आदिवासी समाजाचा झिरवळ त्याला आपण उपाध्यक्ष करू आणि त्यांना आम्ही केलं देखील,असे शरद पवार यांनी सांगितले.
advertisement
शरद पवार पुढे म्हणाले,यांच्यातले काही जण आम्हाला सोडून गेले. कुठेच सापडेना. कुणालाचा त्याचा पत्ता नव्हता. कुणतरी सांगितलं दिल्लील आहेत.त्यामुळे दिल्लीला काही लोक पाठवली. तेव्हा तिकडे कळालं गुडगावच्या एका हॉटेलात आहेत. त्यावेळी हॉटेलच्या खोलीत आमच्या काही कार्यकर्त्यांना घुसायला सांगितले.तेव्हा झिरवळ सिनेमा बघत होते,असे शरद पवार यांनी सांगितले. पळून गेले गुडगावला आणि निवडून आले कुठे नाशिकला, तर कशासाठी महाराष्ट्राच्या विधानसभेच काम करण्यासाठी. पण हे सगळं कामकाज सोडून हा ग्रस्त तिकडे होता. नंतर त्याला मी दिल्लीतल्या माझ्या घरी बोलावलं आणि तिथून परत पाठवलं. त्यानंतर त्यांनी सांगितलं पुन्हा चूक करणार नाही. त्यामुळे गरीब माणूस आहे, आदिवासी माणसू आहे चूक पोटात घेऊ या,असे शरद पवार यांनी सांगितले.
advertisement
त्यानंतर शिंदेसोबत 40 आमदार पळून गेले.त्यानंतर पु्न्हा 40 आमदार पळून गेले, यामध्ये झिरवळ देखील होते. आज ही सगळी मंडळी आम्हाला सोडून गेली आणि तुमच्यासमोर मतं मागायला येतायत.पण लोकांनी मतं दिली, सत्ता दिली, अधिकार दिला. अशावेळेला जो माणूस दोनदा पळून जातो त्याच्यावर भरोसा ठेवायचं काही कारण नाही. हा कुठे जाईल? काय करेल? याची काही खात्री देता येणार नाही, असा हल्ला शरद पवारांनी झिरवळांवर चढवला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sharad Pawar : पळून गेल्यावर माझ्याकडे आले, म्हणाले चूक झाली, विधानसभेचे उपाध्यक्ष केले पण.... शरद पवारांनी झिरवाळांना मतदारसंघात जाऊन घेरले
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement