शरद पवार गटाच्या बैठकीत तुफान राडा, नेते एकमेकांवर गेले धावून, जळगावमधील घटना

Last Updated:

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने जळगाव शहरातील जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मोठा गोंधळ उडाल्याची घटना घडली आहे.

sharad pawar ncp group meeting
sharad pawar ncp group meeting
Jalgaon NCP Meeting Rada : जळगाव,विजय वाघमारे : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने जळगाव शहरातील जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मोठा गोंधळ उडाल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोने नेते एकमेकांवर धावून गेल्याने मोठा राडा झाला होता. पण इतर नेत्यांनी दोन्ही नेत्यांना शांत करून वाद शमवला होता. दरम्यान हा राडा नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला होता? हे जाणून घेऊयात.
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बैठकीदरम्यान आदिवासी सेलच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या नियुक्तीवरून गोंधळ उडाला होता.माजी जिल्हाध्यक्ष इब्राहीम तडवी यांनी आपल्याला डावलून नादान पावरा यांची नियुक्ती झाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
आदिवासी सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत बारेला यांच्या समर्थक नादान पावरा यांची काही दिवसांपूर्वी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. या नियुक्तीतूनच इब्राहीम तडवी यांची पदच्युती झाली होती. अनेक वर्षे पक्षाशी निष्ठेने काम करूनही आपल्याला दुय्यम स्थान दिल्याचा आरोप करत तडवी यांनी आज पक्ष निरीक्षक भास्कर काळे यांच्या उपस्थितीत उघडपणे नाराजी व्यक्त केली होती.
advertisement
बैठकीत झालेल्या गोंधळानंतर इतर पदाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून तडवी यांना समजावले आणि वातावरण शांत केले होते. मात्र, आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या नाराजीमुळे पक्षातील गटबाजी पुन्हा एकदा प्रकर्षाने समोर आल्याचे दिसून आले.
2022 साली मला राष्ट्रवादीचं जिल्हाध्यक्षपद मिळालं.त्यानंतर दीड वर्षांनी चंद्रकांत बालेला याने आमचा प्रदेशाध्यक्षांना हाताशी धरून माझं जिल्हाध्यक्षपद काढून घेतलं आणि त्याच्या कार्यकर्त्याला म्हणजेच नादाना पावराला दिलं. यात माझी कुठलीही चूक नसताना, कुठल्याही तक्रारी नसताना आणि कुणाचाही आक्षेप नसताना माझं पद परस्पर काढलं. 2023 ला हा प्रकार घडला होता.त्यानंतर दोन वर्ष मी शांत बसलो. कारण मला प्रदेशाध्यक्षांनी माझं पद पुन्हा मिळवून देण्याचा शब्द दिला होता.पण दोन वर्षात त्यांनी दिला नाही. आता त्या अध्यक्षपदाचा राजीनामा घेतल्यानंतर तुम्हाला पद देऊ,असे इब्राहीम तडवी यांनी सांगितले.
advertisement
आता ते म्हणतात त्यांचा राजीनामा घ्या आणि माझ्याकडे पाठवा.आता माझा राजीनामा घेतला होता का तुम्ही? मग हा कुठला प्रकार आहे.त्यामुळे बोगस कार्यकर्ते आल्यानंतर पक्षाची वाताहत होत आहे.आणि म्हणून मला आज आवाज उठवाला लागला,असे इब्राहीम तडवी यांनी म्हटले.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शरद पवार गटाच्या बैठकीत तुफान राडा, नेते एकमेकांवर गेले धावून, जळगावमधील घटना
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement