'आयोगावर चमचम करणारी चांदणी नको', ठाकरे गट रुपाली चाकणकरांविरोधात आक्रमक; पुण्यात राडा
- Published by:Prachi Amale
Last Updated:
ठाकरे गटाच्या महिला आक्रमक झाल्या असून पुण्यातील धायरी परिसरातील रूपाली चाकणकर यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले आहे.
अभिजीत पोते, प्रतिनिधी
पुणे :  फलटणच्या डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणावरुन महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण या प्रकरणातील घडामोडींवर पत्रकार परिषदेत भाष्य करताना त्यांनी पीडितेची चारित्र्यहनन केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. यामुळं पीडित डॉक्टर महिलेच्या आई-वडिलांनी चाकणकर ज्या पक्षाच्या नेत्या आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांच्याकडं तक्रार केली आहे. ही तक्रार प्राप्त झाल्यानंतर चाकणकरांच्या विधानांशी आम्ही सहमत नाही, पण त्यांनी असं का केलं? याचा खुलासा त्यांच्याकडून मागवण्यात येईल, अशी स्पष्टोक्ती पवारांनी दिली आहे. चाकणकरांना पदावरुन हटवण्याची मागणी देखील होऊ लागली आहे. याच मागणीसाठी ठाकरे गटाच्या महिला आक्रमक झाल्या असून पुण्यातील धायरी परिसरातील रूपाली चाकणकर यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले आहे.
advertisement
राज्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेबाबत पीडितेच्या कुटुंबीयांनी देखील तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर आज रूपाली चाकणकर यांनी आत्महत्याग्रस्त डॉक्टर महिलेचा अपमान केल्याचा ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे. रूपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा महिला पदाधिकाऱ्यांची मागणी या महिलांनी केली आहे.
advertisement
पोलीस आणि आंदोलकांमध्ये गोंधळ
ठाकरे गटाच्या महिला रूपाली चाकणकर यांच्या कार्यालयाच्या बाहेर दाखल झाल्या असून गोंधळ होण्याची शक्यता आहे. रूपाली चाकणकर यांच्या कार्यालयाबाहेर ठाकरे गटाच्या महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली.
दोन्ही गटाच्या महिला पदाधिकारी आमने सामने आल्या. चाकणकरांच्या कार्यालयाबाहेर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
ठाकरे गटाकडून जोरदार घोषणाबाजी
कार्यालयाबाहेर पोलिसांमध्ये आणि आंदोलकांमध्ये गोंधळ पाहायला मिळाला. ठाकरे गटाच्या महिलांचा रूपाली चाकणकर यांच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला , मात्र पोलिसांनी अडवलं, त्यामुळे गोंधळाचं वातावरण पाहायला मिळाले. महिला आयोगावर चमचम करणारी चांदणी नको, राजीनामा द्या ; ताई तू पैठणीची महाराणी तुला काय कळणार महिलांची कहाणी, राजीनाम द्या अशी घोषणाबाजी करण्यात येत आहे.
advertisement
बीडमध्ये देखील आंदोलन तीव्र
टॉवरवर चढून मागितला रुपाली चाणकरांचा राजीनामा बीडमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी करत काही तरुणांनी बीड शहरातील बशीरगंज भागात असलेल्या बीएसएनएल टॉवरवर चढून आंदोलन केलं. रूपाली चाकणकर यांनी दोन दिवसांपूर्वी मृत महिला डॉक्टर बाबतीत वादग्रस्त वक्तव्य केले.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
October 31, 2025 4:02 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'आयोगावर चमचम करणारी चांदणी नको', ठाकरे गट रुपाली चाकणकरांविरोधात आक्रमक; पुण्यात राडा


