Udhhav Thackeray : RSSला संकरीत भाजप अपेक्षित होता का? मूळ बियाणं कुठे गेलं? ठाकरेंचा सवाल
- Published by:Suraj
Last Updated:
मविआच्या काळात विकासकामांना स्थिगिती दिली गेली असा आरोप सध्या महायुतीकडून होत आहे. या आरोपांना उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं.
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी न्यूज १८ लोकमतला मुलाखत दिली. शिवसेनेतील फूट, महायुतीने केलेले आरोप आणि महाविकास आघाडीच्या समन्वयासंदर्भात विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरं दिली. मविआच्या काळात विकासकामांना स्थिगिती दिली गेली असा आरोप सध्या महायुतीकडून होत आहे. या आरोपांना उत्तर देताना ठाकरेंनी म्हटलं की, आम्ही विरोध केला असता तर मविआ सरकार पाडल्यानंतर थोड्याच दिवसात ते अटल ब्रिजचं उद्घाटन करू शकले असते का? मेट्रोला विरोध नव्हता तर आरेतील पर्यावरणाच्या होणाऱ्या हानीसाठी आमचा विरोध होता असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
धारावीच्या मुद्द्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, धारावीचा विकास झाला पाहिजे, त्यांना तिथल्या तिथे घर देऊन विकास करा. त्यांना धारावीतून बाहेर घालवायचं आणि बाहेरच्यांना तिथं आणायचं? बाहेर गेल्यावर त्यांना उद्योग काय? कोळीवाड्यात लोकांना जागा लागते, मासे वाळवायचे असतात, त्यांच्या होड्या असतात त्या कुठे ठेवणार, त्यांना मुंबईचं महत्त्व मारायचं, मुंबईचं आर्थिक केंद्र हलवायचं असल्याचा आरोप ठाकरेंनी केला.
advertisement
महायुतीत अद्याप मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केलेला नाही. पण अमित शहांनी त्यांच्या सभेत संकेत दिले. तसंच मविआतसुद्धा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा अद्याप ठरला नाहीय. याबद्दल विचारलं असता उद्धव ठाकरे म्हणाले की, त्यांचा त्यांनी एकतर्फी चेहरा सांगितलाय. महायुतीत बाकीच्या पक्षांना विश्वासात घेतलं जात नाही. आम्ही मविआत मात्र एकत्र आहोत आणि एकत्र येऊन चेहरा ठरवू.
advertisement
महायुतीकडून आम्ही गती वाढवली असं म्हटलं जातंय. त्याबद्दल विचारलं असता ठाकरेंनी म्हटलं की, कामं पूर्ण होऊन तुटायला लागली, राम मंदिर गळतंय, संसद गळतंय, बुलेट ट्रेनचा पूल कोसळला. शिवरायांचा पुतळा कोसळला, समृद्धीला खड्डे पडायला लागले. जबलपूरमध्ये छत कोसळलं, ही कामं पूर्ण होतायत का,
कॉन्ट्रॅक्टरचे आणि त्यांच्या माध्यमातून आपले खिसे भरायला अनावश्यक, नियोजन शून्य विकास सुरू आहे.
advertisement
मुंबईची हवा अशुद्ध होत चाललीय. हा विकास काय कामाचा, कॉन्ट्रॅक्टरचा हा विकास असल्याची टीका उद्दव ठाकरे यांनी केली.
एकनाथ शिंदेंनी आरोप केला की तुम्ही कामं थांबवलं, या आरोपांना उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मिद्द्यांचं सोडा, त्यांचा एकच मित्र आहे. पण मुंबईचा कोस्टल रोडचं स्वप्न कुणी दाखवलं. शिवसेनेच्या वचननाम्यात होतं. त्याचं श्रेय तुम्ही घ्या पण काहीतरी शिवसेनेनं दिलं. अटल ब्रिज थांबवला असता तर सरकार पाडल्यानंतर थोड्याच दिवसात उद्घाटन कसं करू शकले असते? मेट्रोचं काम नाही थांबवलं. मुंबईचं पर्यावरण मारताय. आरे कार शेडला विरोध आहे आमचा. दुर्दैवाने मुंबईचं पर्यावरण मारताय हा कोणता विकास? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.
advertisement
तुम्हाला घेरलं जातंय का, आदित्य ठाकरेंविरोधात सगळे एकत्र आलेत, वरळीत आव्हान दिलं जातंय याबद्दल काय सांगाल असं विचारताच उद्धव ठाकरे म्हणाले की, आमच्या सहा सात पिढ्यांचा इतिहास हेच सांगतो की जनतेसाठी काम करतायत. त्यामुळे जनतेनं ठऱवावं काय करायचं. आम्ही काहीच मानत नाही, मला चिंताच नाही, आम्ही आमच्यासाठी काहीच मागत नाही.
advertisement
ही शिवसेनेच्या अस्तित्वाची लढाई आहे का?
-मराठी माणसाला संपवायचं, आम्हाला महाराष्ट्र लुटू देत नाही त्या शिवसेनेला संपवायचं हा मोदी शहांचा डाव आहे. याआधीही शिवसेना फुटली पण कुणी पक्ष संपवण्याचा प्रयत्न केला नव्हता. मिंदेंनी तर मोदी शहांचे आभार मानले की तुम्ही मला नाव आणि चिन्ह दिलं.
आपला देश हा संघराज्य आहे. विविधतेत एकता आहे. त्याला तडा जाईल तेव्हा अस्थिरता येईल. प्रादेशिक अस्मितेचा मान राखला पाहिजे. भाषावार प्रांत रचना झालीय. प्रत्येक भाषेला प्रांत मिळालाय. त्या भाषेचा मान सन्मान राखला गेला पाहिजे. केंद्र सरकार अशी संकल्पना नाहीय. आपत्कालीन परिस्थितीत संघराज्यात त्या सरकारला राज्य किंवा त्यांचे अधिकार सारखे आहेत.
advertisement
संघाबद्दल काय मत?
ते संघराज्य नाही, संघालासुद्धा विचारायचंय की हा भाजप अपेक्षित होता का, संघाला १०० वर्षे होतायत. १०० वर्षे तुम्ही असा संकरीत भाजप अपेक्षित होता का, मूळ बियाणं कुठे गेलं, हेच ते बियाणं होतं का, तुमचा हा विचित्र भाजप का झालाय, ना शेंडा, ना बुडका, ओळखच राहिली नाही भाजपची.
शिवसेना- उबाठा नाव
- निवडणूक आयोगाचा अधिकारच मानत नाही नाव बदलण्याचा, निवडणूक आयोगाला मी ये धोंड्या म्हणलं तर मला अधिकार आहे का, तसं त्यांनी नाव नाही बदलायचं माझं, माझं नाव बदलण्याचा अधिकार नाही. तीन न्यायमूर्ती गेले, आता चौथे आलेत. ८ तारखेला सुनावणी होती, पण ती बतावणी निघाली. चंद्रचूड साहेबांना घेऊन यमाईदेवीच्या मंदिरातच जाणार आहे. काय तो न्याय द्या आम्हाला.
जनतेला तुम्ही गृहीत धरता का, एकदा इकडे एकदा तिकडे -
-आम्ही जे करतो ते उघड करतो, नैसर्गिक युती जे ते म्हणाले, त्यांचा नेताच अनैसर्गिक आहे ते त्यांनीच सांगितलंय. त्यांनी मला खोटं पाडल्यानं, मी माझ्या वडिलांना दिलेलं वचन पूर्ण करणार आणि ते नैसर्गिक आहे. ते पूत्र कर्तव्य मी पार पाडणार आहे.
येत्या काळात शिवसेनेत नवे चेहरे -
- काही वेळेला असं होतं की एखाद्याच्या प्रेमात पडतो. सडलेली पानं झडलीच पाहिजेत. तरच नवे कोंब येतात. सडलेली पानं पडलीय आता ती सडणारच.
नवी समीकरणं होतील का
अभ्यासक बारामती गुंग झाले होते. नवी समीकऱणं वगेरै नाही. महाराष्ट्राची लूट थांबवणं आणि महाराष्ट्राचं वैभव वाढवणं. महिलांना सुरक्षा देणं, महिला आणि पुरुष स्वावलंबी झाले पाहिजेत. कोरोनाकाळात जे मी काय केलं त्यामुळे लोक मला कुटुंबप्रमुख मानतायत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 09, 2024 11:44 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Udhhav Thackeray : RSSला संकरीत भाजप अपेक्षित होता का? मूळ बियाणं कुठे गेलं? ठाकरेंचा सवाल


