सिद्धीविनायक मंदिरात ड्रेस कोड; अंगभर,भारतीय परंपरेला साजेसेच कपडे घालावे, मंदिर न्यासाचा मोठा निर्णय
- Published by:Prachi Amale
Last Updated:
पारंपारिक वस्त्र परिधान करून महिलांनी आणि पुरुषांनी मंदिरामध्ये दर्शनासाठी यावं असं या पत्रकामध्ये सांगितले आहे
मुंबई: जगभरातील गणेशभक्तांचे आराध्य दैवत बनलेल्या मुंबईतील सुप्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिरात आजा ड्रेस कोड लागू करण्यात आलां आहे. सिद्धीविनायक मंदिरात दर्शनासाठी रोज हजारो भाविक येत असतात. मुंबईतीलच नव्हे तर देशभरातून भाविक गणरायाच्या दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी नेहमी रांगा लागलेल्या असतात. भाविकांना पावणारा गणराया म्हणून सिद्धिविनायक मंदिराची ख्याती आहे. ड्रेस कोड संदर्भात सिद्धीविनायक मंदिर न्यासाने या संदर्भात अधिकृत पत्रक प्रसिद्ध केलं आहे.
जगभरातील गणेशभक्तांचे अराध्य दैवत बनलेल्या मुंबईतील सुप्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिरात आजा ड्रेस कोड लागू करण्यात आलांय. सिद्धीविनायक मंदिर न्यासाने या संदर्भात अधिकृत पत्रक प्रसिद्ध केले आहे. नागरिकांना संकोच वाटणार नाही असे कपडे भाविकांनी परिधान करावे. सिद्धीविनायक मंदिरात येणाऱ्या भाविकांनी आता भारतीय पारंपारिक वेशभूषा किंवा अंगभर कपडे घातले पाहिजे तरच त्यांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश देण्यात येणार असल्याचं पत्र मंदिर न्यासाकडून प्रसिद्ध करण्यात आलंय.सिद्धीविनायक मंदिर न्यासाच्या या निर्णयावर वाद होण्याची शक्यता.
advertisement
भारतीय परंपरेला साजेसे शोभेल असे कपडे घालावे
मंदिरात दर्शनासाठी येताना भारतीय परंपरेला साजेसे, शोभेल असेच पारंपारिक वस्त्र परिधान करून महिलांनी आणि पुरुषांनी मंदिरामध्ये दर्शनासाठी यावं असं या पत्रकामध्ये सांगितले आहे.
देशभरातील अनेक मोठ्या मंदिरांमध्ये ड्रेस कोड
देशभरातील अनेक मोठ्या मंदिरांमध्ये आधीच वस्त्र संहिता आहे. काही कोणी मंदिरात अशोभनीय, तोकडे कपडे घालून आले तर त्याला परत पाठवण्याऐवजी मंदिराच्या प्रवेशद्वारावर शॉल, ओढणी, धोतर असे कपडे देण्यात येते. भाविकाला ते वापरून पांघरून मंदिरात जाता येते. ड्रेसकोडबाबत मंदिराने कडक नियम घालून दिले आहेत. केवळ महिलाच नाही तर पुरुषांसाठी देखील हे नियम घालण्यात आले आहे. दक्षिण भारतातील बहुतांश मंदिरात ड्रेस कोड आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 28, 2025 3:13 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सिद्धीविनायक मंदिरात ड्रेस कोड; अंगभर,भारतीय परंपरेला साजेसेच कपडे घालावे, मंदिर न्यासाचा मोठा निर्णय