VIDEO: कोल्हापूर, सांगलीनंतर आता गडचिरोली संकटात, हा अख्खा तालुका पूरात बुडण्याची चिन्हं?
- Published by:Rohit Shinde
Last Updated:
कोल्हापूर, सांगली पाठोपाठ आता गडचिरोली जिल्ह्यालाही पूराचा धोका संभवतो आहे....सिरोंचा तालुक्याला पूराचा धोका आहे....
गडचिरोली: कोल्हापूर, सांगलीनंतर आता गडचिरोली जिल्ह्यावर पूराचं संकट घोंघावत आहे. कोल्हापूर, सांगलीतील पूर ओसरताना दिसत आहे. तर तिकडे विदर्भात गडचिरोलीतील अख्खा सिरोंचा तालुका पूरसंकटात जातो की काय , अशी भीती निर्माण झाली आहे.
गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्याला पूराचा धोका:
तेलंगणाचे येल्लमपल्ली आणि कडेम ही दोन धरण पूर्ण भरली आहेत. गडचिरोली जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात ही धरणे आहेत. दोन्ही धरणं गोदावरी नदीवर बांधण्यात आली आहेत. यामध्ये तेलंगणा सरकारने कुठलीही पूर्वसूचना न देता पाणी सोडल्यास गोदावरी नदीला महापूर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गोसीखुर्द धरणातून सध्या तीन लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर तेलंगणाच्या प्रशासनाने कुठलीही पूर्व सूचना न देता येलमपल्ली आणि कडेम या दोन्ही धरणांमधील पाणी सोडल्यास सिरोंचा तालुक्यात गोदावरी आणि प्राणहिता नदीला महापुराचा धोका निर्माण होण्याची भीती वर्तवली जात आहे.
advertisement
Flood: कोल्हापूर, सांगलीनंतर आता गडचिरोली संकटात, हा अख्खा तालुका पूरात बुडण्याची भिती? pic.twitter.com/OWo9RD77UT
— News18Lokmat (@News18lokmat) July 28, 2024
2022 मध्ये तेलंगणाच्या प्रशासनाने कुठलीही पूर्व सूचना न देता त्या धरणांमधून पाणी सोडल्याने महापूर आला होता. आता ही परिस्थिती टाळण्यासाठी गडचिरोली जिल्हा प्रशासन तेलंगणाच्या प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये राज्यस्तरावर देखील प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे. ज्याप्रमाणे अलमट्टी धरणातील विसर्गाने कोल्हापूर, सांगलीतील पूरस्थितीत सुधारणा होते. अगदी त्याचप्रमाणे येलमपल्ली आणि कडेम धरणांतील पाण्याच्या विसर्गाचे नियमन केल्यास सिरोंचा तालुक्याला असणारा पूराचा धोका टाळता येऊ शकतो.
advertisement
कोल्हापूर-सांगलीत पूरस्थिती नियंत्रणात:
गेल्या आठवडाभरापासून कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या वाढत्या पाणीपातळीने कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील जनतेला धडकी भरवली होती. परंतू संततधार कोसळणाऱ्या पावसाने आता काही प्रमाणात उघडीप दिली असल्याने कृष्णा आणि पंचगंगा नदी पुन्हा एकदा इशारा पातळीच्या खाली पोहोचली आहे. कोल्हापूरात पुरग्रस्तांना मदतीचा हात दिला जात आहे. त्याचबरोबर अचानक मुसळधार पाऊस झाल्यास अलमट्टी धरणाचा विसर्ग सुरळीत व्हावा, या अनुषंगाने कर्नाटक सरकारसोबत सातत्याने राज्यातील नेते आणि राज्य सरकारचा संवाद सुरू आहे.
advertisement
Location :
Gadchiroli,Maharashtra
First Published :
July 28, 2024 7:12 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
VIDEO: कोल्हापूर, सांगलीनंतर आता गडचिरोली संकटात, हा अख्खा तालुका पूरात बुडण्याची चिन्हं?