"...तर तुला बघून घेतो", सोलापुरात भाजप नेता तडीपार गुंडाच्या कार्यक्रमाला, जिल्हाध्यक्षांनाच धमकी
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
सोलापुरात भाजपच्या एका आमदाराने तडीपार गुंडाच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याने पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
प्रीतम पंडित, प्रतिनिधी सोलापूर: सोलापूरमध्ये भारतीय जनता पार्टीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. येथील भाजपच्या एका आमदाराने तडीपार गुंडाच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याने पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. या कार्यक्रमातून भाजप नेत्याने आपल्याच पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना धमकी दिली आहे. तुला बघून घेईन, अशा आशयची धमकी त्यांनी दिली आहे. तसेच त्यांनी पक्षालाच बंडखोरीचं आव्हान दिलं आहे. यामुळे सोलापुरात भाजपचा अंतर्गत वाद चर्चेचा विषय ठरत आहे.
सोलापुरात नक्की काय घडतंय?
सोलापूर शहर उत्तरचे भाजपचे आमदार विजय देशमुख यांनी नुकतंच सोलापूर आणि धाराशिवमधून तडीपार असलेल्या गुंड श्रीशैल हुळ्ळे याच्या कार्यक्रमास उपस्थित राहून त्याचा सत्कार केला. यावेळी हुळ्ळे याच्यासह आमदार देशमुख यांनीही भाषण केलं. या भाषणाची क्लिप व्हायरल होताच नागरिकांमधून तिखट प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. विधानसभा निवडणुकीत "बटेंगे तो कटेंगे" म्हणणाऱ्या आमदारांनी स्वतःच्या समाजापुरते विचार व्यक्त केल्याने ते जातीयवादी असल्याची टीका होत आहे.
advertisement
या कार्यक्रमात आमदार देशमुख यांनी भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्या विरोधात विधान करत बघून घेण्याची भाषा केली. त्यांनी पक्षालाही बंडखोरीचं थेट आव्हान दिलं. या सगळ्या घडामोडीनंतर सोलापूर पोलिसांनी तडीपारीची नोटीस निघालेल्या श्रीशैल हुळ्ळे तडीपार असूनही शहरात फिरत असल्याने आणखी एक गुन्हा दाखल केला आहे.
आमदार देशमुख यांनी मी वीरशैव असून समाजासाठी एक काय अशा दहा बैठका घेणार असल्याचे सांगितले. या भागात लिंगायत समाज बहुसंख्य आहे. त्यामुळे आपला माणूस निवडून आला पाहिजे. आगामी निवडणुकीत आपली ताकद दाखवल्याशिवाय राहायचं नाही. महापालिकेत तिकीट दिले नाही तर बघून घेऊ, अशी धमकी देखील त्यांनी दिली.
advertisement
तुम्हाला कुणी त्रास दिला तर मी तुमच्या पाठीशी आहे. पक्ष विसरून तुमच्या पाठीशी राहू, असे सांगत थेट पक्षाला आव्हान दिले. एका तडीपार गुंडाला पाठीशी घालत आमदार विजय देशमुख यांनी भाजप शहराध्यक्ष आणि थेट पक्षाला आव्हान देत बघून घ्यायची भाषा केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
October 07, 2025 8:56 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
"...तर तुला बघून घेतो", सोलापुरात भाजप नेता तडीपार गुंडाच्या कार्यक्रमाला, जिल्हाध्यक्षांनाच धमकी