Solapur Flood: सीना नदीचा महापूर ओसरायला सुरुवात, सोलापूर – पुणे – कोल्हापूर वाहतूक पुन्हा सुरू
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Solapur Pune Highway: सोलापुरातील सीना नदीच्या महापुराचे पाणी ओसरू लागले आहे. त्यामुळे कोल्हापूर आणि पुणे महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे.
सोलापूर: गेल्या 3 दिवसांपासून सोलापुरातील सीना नदीला आलेल्या महापुरामुळे सर्वत्र हाहाकार माजवला आहे. मंगळवारपासून सोलापूर-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. तसेच सोलापूर – कोल्हापूर महामार्गही बंद झाला होता. आता सीना नदीचा महापूर ओसरू लागला आहे. त्यामुळे या दोन्ही महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे सीना नदीला महापूर आला आहे. यामुळे गेल्या दोन दिवसांपासून सोलापूर – कोल्हापूर आणि सोलापूर – पुणे महामार्गांवरील वाहतूक ठप्प झाली होती. आता महापुराचे पाणी ओसरू लागले आहे. आज सकाळपासून दोन्ही महामार्गांवरून वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या 2 दिवसांपासून महामार्गांवर अडकून पडलेले प्रवासी आणि वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे.
advertisement
सीना नदीला आलेल्या महापुराचे पाणी रस्त्यावर आल्याने लांबोटी पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली होती. मंगळवारी सकाळी पाणी पातळी वाढल्याने एका बाजूची वाहतूक बंद करण्यात आली होती. रात्री अकरा वाजलेपासून दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात आली. तर तिऱ्हे येथे महामार्गावर पाणी आल्याने सोलापूर – कोल्हापूर महामार्ग देखील वाहतुकीस बंद करण्यात आला होता. मात्र, आज सकाळपासून पाणी ओसरल्याने दोन्ही मार्गांवरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे. याचा फायदा मुंबईहून दक्षिणेकडे जाणाऱ्या वाहनांना होणार आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
September 25, 2025 12:23 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Solapur Flood: सीना नदीचा महापूर ओसरायला सुरुवात, सोलापूर – पुणे – कोल्हापूर वाहतूक पुन्हा सुरू