Solapur Railway: सोलापूरहून दक्षिणेत जाणाऱ्या प्रवाशांसाठी खूशखबर, या मार्गावर धावणार विशेष रेल्वे, वेळापत्रक
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
Solapur Railway: सोलापूरहून दक्षिण भारतात जाणाऱ्या प्रवाशांसाठी खूशखबर आहे. दिवाळाआधीच मध्य रेल्वेने खास रेल्वेची घोषणा केली असून अनकापल्लीपर्यंत विशेष गाड्या धावणार आहेत.
सोलापूर: सोलापूरहून तिरुपतीकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी खूशखबर आहे. सोलापूर - धर्मवरम (पूर्वी तिरुपतीपर्यंत) रेल्वेबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा व मागणीचा विचार करून या मार्गाचा विस्तार केला आहे. आता सोलापूर विभागातून अनकापल्लीपर्यंत रेल्वे धावणार असून आजपासून म्हणजेच 9 ऑक्टोबर 2025 पासून विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत.
सोलापूर - अनकापल्ली साप्ताहिक विशेष गाड्या
गाडी क्रमांक 01437 साप्ताहिक विशेष रेल्वे गाडी सोलापूरहून 9 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबरपर्यंत दर गुरुवारी रात्री 11:20 मिनिटांनी निघेल आणि तिसऱ्या दिवशी दुपारी 1 वाजता अनकापल्ली येथे पोहोचेल. तर सोलापुरातून या गाडीच्या 4 फेऱ्या होतील.
गाडी क्रमांक 01438 साप्ताहिक विशेष रेल्वे अनकापल्ली येथून 11 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबरपर्यंत धावणार आहे. दर शनिवारी अनकापल्ली येथून दुपारी 05:35 मिनिटांनी निघेल आणि सोलापूरला तिसऱ्या दिवशी सकाळी 10:30 मिनिटाला पोहोचेल. तर या विशेष रेल्वे गाडीचे अनकापल्ली ते सोलापूर 4 फेऱ्या होतील.
advertisement
थांबे कुठं?
या सोलापूर - अनकापल्ली विशेष रेल्वे गाडीला कुर्डुवाडी, बार्शी टाऊन, धाराशिव, लातूर, लातूर रोड, कलबुरगि, वाडी, यादगिर, कृष्णा, रायचूर, मंत्रालयम रोड, अदोनी, गुंतकल, अनंतपूर, धर्मवरम, कदिरी, मदनपल्ली रोड, पीलेर, पाकाला, तिरुपति, रेणिगुंटा, श्री कालहस्ती, गुडूर, नेल्लूर, ओंगोल, चीराला, तेनाली, विजयवाडा, एलुरु, ताडेपल्लीगुडेम, निडदवोलु, राजमंड्री, सामलकोट, अन्नवरम आणि एलमंचिली या रेल्वे स्थानकावर थांबा घेईल.
advertisement
डब्यांची रचना - एकूण 22 डबे, टू टायर एसी -1, थ्री टायर एसी-1, 11 स्लीपर क्लास, 4 जनरल सेकंड क्लास आणि 2 सामान-कम-ब्रेक व्हॅन.
प्रवाशांनी गाड्यांचा तपशील पाहून तिकीट बुकिंग करून प्रवासाचा आनंद घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
October 09, 2025 10:47 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Solapur Railway: सोलापूरहून दक्षिणेत जाणाऱ्या प्रवाशांसाठी खूशखबर, या मार्गावर धावणार विशेष रेल्वे, वेळापत्रक