Solapur News: लग्नावरून परतताना काळानं गाठलं, एकुलता एक लेक कायमचा गेला, सोलापूरचे चौघे मित्र...
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
Solapur News: सोलापुरातील वळसंग परिसरात लग्नावरून परतणारी कार खड्ड्यात उलटली. या अपघातात एका तरुणाने अंतिम श्वास घेतला तर चौघे रुग्णालयात आहेत.
सोलापूर - लग्न आटोपून निघालेल्या कारचा सोलापुरातील वळसंग येथे भीषण अपघात झाला. यामध्ये एकुलता एक असणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला असून चौघे मित्र गंभीर जखमी आहेत. जखमी झालेल्या चौघांवर सोलापूर शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर मैंदर्गी येथील पंकज शिवानंद लोहार या 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. त्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे.
लग्न उरकून सर्वजण रविवारी रात्री आचेगाव ते वळसंगकडे स्विफ्ट गाडीने येत होते. वळसंग गावाच्या अलीकडे रस्ते अपघातामध्ये कार उलटली आणि हा अपघात झाला. या अपघातामध्ये मैंदर्गी येथे राहणाऱ्या शिवानंद लोहार यांचा एकुलता एक 25 वर्षांचा मुलगा पंकज शिवानंद लोहार याचा मृत्यू झाला. तर या अपघातामध्ये गणेश पोतदार (वय 23, राहणार सोलापूर), दर्शन सुनील गुरव (वय 22, राहणार आचेगाव तालुका दक्षिण सोलापूर), निंगप्पा लोटनवरु (वय 23), परमेश्वर तलवार (वय 23) हे तरुण जखमी झाले. त्यांच्यावर सोलापूर शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की गाडीचा समोरचा भाग चुराडा झाला आहे.
advertisement
या अपघाताची माहिती मिळताच सोलापूर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी तातडीने शासकीय रुग्णालयात पाठवून दिले. तरी अपघातात अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी गावात राहणारा पंकज शिवानंद लोहार या तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर जखमी झालेल्या दर्शन गुरव, गणेश पोतदार, परमेश्वर तलवार आणि लिंगप्पा लोटेनवरु या तरुणांच्या डोक्याला, चेहऱ्याला, हाता-पायाला, नाकाला जखमा झाल्या आहेत.
advertisement
दरम्यान, हा भीषण अपघात कसा झाला? याचा तपास सध्या पोलिस करत असून या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकी येथे झाली आहे. अपघाताची माहिती नातेवाईकांना मिळताच सोलापुरातील शासकीय रुग्णालयात नातेवाईकांनी गर्दी केली होती.
view commentsLocation :
Solapur,Maharashtra
First Published :
December 02, 2025 11:18 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Solapur News: लग्नावरून परतताना काळानं गाठलं, एकुलता एक लेक कायमचा गेला, सोलापूरचे चौघे मित्र...


