सोलापुरातील नामांकित शाळेत धक्कादायक प्रकार, दहावीच्या विद्यार्थिनीचा 56 वर्षांच्या शिक्षकाकडून विनयभंग

Last Updated:

Solapur Crime News : सोलापुरातील नामवंत खाजगी शाळेतून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांनीचा 56 वर्षीय शिक्षकाने विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे.

 56 year old teacher molests 10th grade student
56 year old teacher molests 10th grade student
Solapur Crime News : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महिला अत्याचाराच्या घटना वाढत असताना आता सोलापूरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापूर शहरातील एका नामांकित खासगी शाळेत दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा 56 वर्षीय शिक्षकाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा प्रकार 19 एप्रिल ते 3 जुलै या कालावधीत शाळेच्या पार्किंगमध्ये घडल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विनयभंग करणाऱ्या शिक्षकाने विद्यार्थिनीला धमकी दिली होती, त्यामुळे तिने सुरुवातीला कोणाकडंही तक्रार केली नाही. याचाच फायदा घेत आरोपी तरुणीला वारंवार त्रास देत होता.

"तू काही कामाची नाही"

"तुला काही ज्ञान नाही, तू काही कामाची नाहीस, तू दहावीला आहेस, आता तू चांगली सापडली आहेस," अशा अनेक प्रकारे पीडित विद्यार्थिनीला नराधम शिक्षक धमकावत असत. मात्र, शाळेच्या प्राचार्यांच्या ही बाब लक्षात येताच, त्यांनी तातडीने पीडित विद्यार्थिनीला सल्ला दिला आणि त्यांच्या सल्ल्यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
advertisement

गुन्हा दाखल

गंभीर प्रकाराबाबत सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. गेल्या काही दिवसात सोलापूरमधील गुन्हेगारी देखील वाढल्याचं चित्र समोर येतंय. स्वतःला मुलं असतानाही सिद्धेश्वर मंदिर परिसरातील फिरस्त्या महिलेच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या हत्तुर वस्ती परिसरातील महिलेला आणि तिच्या साथीदाराला फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक करण्यात आली होती.
advertisement
दरम्यान, काही दिवसांपूर्वी करमाळा तालुक्यातील पुनवर गावात खाजगी दवाखाना चालवणाऱ्या आणि कोणतीही मान्यताप्राप्त वैद्यकीय पदवी नसताना उपचार करणाऱ्या एका बंगाली बोगस डॉक्टरवर पोलिसांनी कारवाई करण्यात आली होती.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
सोलापुरातील नामांकित शाळेत धक्कादायक प्रकार, दहावीच्या विद्यार्थिनीचा 56 वर्षांच्या शिक्षकाकडून विनयभंग
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement