21 वर्षाच्या पोरीच्या नादात बार्शीत माजी उपसरपंचाने संपवलं आयुष्य! गोविंदसमोर पुजाने अशी काय मागणी केली होती?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Solapur Former deputy sarpach ends life : गोविंदचा मित्र चंद्रकांत शिंदे याने आणि गोविंदने तिला एक दिवस बंगला दाखवला आणि ती दोन दिवस बंगल्यात देखील राहिली. तिला तो बंगला इतका आवडला की, तिने गोविंदकडे बंगला नावावर करून देण्याचा तगदा लावला.
Solapur Crime News : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात घडलेल्या एका घटनेमुळे मोठी खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. गेवराई येथील गोविंद बर्गे या माजी उपसरपंचाने एका नर्तिकेच्या घरासमोरच स्वतःवर पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. अशातच आता गोविंद आणि पुजा यांच्यातील प्रेमसंबंध उघड झालं आहे. गोविंदने पुजाला मोक्कार पैसा दिला होता. लाखोंचं सोनं आणि फ्लॉट देखील तिच्या नावावर केला होता. शिवाय मावशी आणि भावाच्या नावावर पाच एकर जमिन केली होती. तसेच तिला नवी कोरी बुलेट देखील दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
पुजाला काय हवं होतं?
गोविंद यांनी गेवराईत मोठा बंगला बांधला होता. तिथं त्याचं कुटूंब राहत होतं. गोविंदचा मित्र चंद्रकांत शिंदे याने आणि गोविंदने तिला एक दिवस बंगला दाखवला आणि ती दोन दिवस बंगल्यात देखील राहिली. तिला तो बंगला इतका आवडला की, तिने गोविंदकडे बंगला नावावर करून देण्याचा तगदा लावला. तुला दुसरा बंगला घेऊन देतो, असं प्रॉमिस देखील गोविंदने केलं होतं. परंतू पुजाला हा बंगला खूपच आवडल्याने तिने गोविंदचं काहीही ऐकलं नाही. बंगला तुला दिलाय हे माझ्या बायकोला आणि माझ्या वडिलांना कळला तर भावकीत माझी अब्रु जाईल, असं गोविंद पुजाला म्हणाला होता. मात्र, पुजाने काहीही ऐकलं नाही.
advertisement
फिर्यादीत पुजावर आरोप काय?
पुजा देविदास गायकवाडने गोविंदचे सोबत कला केंद्रात झालेल्या ओळखीचा फायदा घेवून, प्रेमसंबध ठेवले अन् वेळोवेळो पैसे, सोने नाणे व मावशीचे व नातेवाईकाचे नावावर प्लॉट, जमीन यापूर्वी घेवून दिली होती. पुन्हा आणखीन भावाच्या नावावर 5 एकर शेती करण्याचा किंवा गेवराईतील नवीन घर नावावर कर नाहीतर तुला बोलणार नाही, तुझ्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन आणि पैसे देण्याकरीता वारंवार तगादा लावला होता. भावजी गोविंद यांना स्वतः पिस्टलने डोक्यात कानाजवळ गोळी घालून घेवून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप फिर्यादी लक्ष्मण चव्हाण यांनी म्हटलं आहे.
advertisement
घटनास्थळी काय काय दिसलं?
पोलिसांनी गाडी जवळ जाऊन पाहिले, गाडी आतून लॉक होती. पोलिसांनी गोविंदच्या नातेवाईकांशी संपर्क साधून दुसरी चावी मागवून घेतली अन् गाडीचे लॉक काढलं. गाडीत परदेशी बनावटीचे एक पिस्टल आणि एक पुंगळी आढळली, त्याच बंदुकीतून गोळी सुटल्याचं स्पष्ट झालं आहे. पोलिसांनी नातेवाइकांच्या उपस्थितीत मृतदेह उत्तरीय चाचणीसाठी शासकीय रुग्णालयात हलविला. गोविंद बर्गे याने ज्या बंदुकीतून गोळी झाडून घेतली, त्यात एकच गोळी होती. त्याच्या डोक्यातून गोळी आरपार गेली होती. त्याच्याकडे परवान्याची कोणतीही बंदूक नव्हती, असं नातेवाइकांनी पोलिसांना सांगितलंय.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
September 10, 2025 12:27 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
21 वर्षाच्या पोरीच्या नादात बार्शीत माजी उपसरपंचाने संपवलं आयुष्य! गोविंदसमोर पुजाने अशी काय मागणी केली होती?