Solapur News: प्रामाणिकपणाचे कौतुक! रिक्षाचालकाने लाखाचे दागिने केले परत, पोलिसांकडून रिवॉर्ड!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
Solapur News: सोलापुरात रिक्षा चालकाच्या एका कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. रिक्षात राहिलेली एक लाख रुपये किमतीचे दागिने असलेली बॅग पोलीस स्टेशनला जमा केली.
सोलापूर – सध्याच्या काळात प्रामाणिकपणा हा तसा दुर्मिळ गुण मानला जातोय. परंतु, सोलापुरातील रिक्षा चालकाने एक अनोखा आदर्श निर्माण केलंय. शहरातील सैफुल चौक ते माणिक चौक पर्यंत रिक्षाने प्रवास करणारी एक महिला रिक्षातच सोन्याची अंगठी विसरून गेली. तेव्हा रिक्षाचालक नंदू बेनिसंग चव्हाण यांनी एक लाख किमतीची अंगठी पोलिसांच्या स्वाधीन केली. त्यांच्या या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे.
नंदू बेनसिंग चव्हाण हे नेहमी प्रमाणे आपली रिक्षा घेऊन भाड्यासाठी निघाले होते. त्यांना संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास महिला प्रवासी भाडे सैफुल चौक ते माणिक चौक पर्यंत मिळाले होते. MH 13 CT 2384 या रिक्षातून त्यांनी माणिक चौकात महिला प्रवाशाला सोडले. काही अंतरावर गेल्यावर रिक्षा मध्ये भाडे बसवत असताना त्यांना एक पिशवी दिसली. पिशवी मध्ये पाहिले असता काही वस्तू आणि एक सोन्याची अंगठी आढळली. जवळपास त्याची किंमत एक लाख रुपये पर्यंत आहे.
advertisement
रिक्षाचालकाने सोन्याची अंगठी पाहिल्यावर ज्या ठिकाणी भाडे सोडले होते तिथे जाऊन प्रवाशी महिलेचा शोध घेतला. परंतु ती महिला सापडली नाही. तेव्हा रिक्षा चालक नंदू चव्हाण यांनी रिक्षा मालक वकील अहमद बागवान यांना घडलेली घटना सांगितली. त्यांनी सोलापूर शहर वाहतूक शाखा दक्षिण पोलिस निरीक्षक रवींद्रनाथ भंडारे यांच्याशी संपर्क साधून सर्व माहिती सांगितली. तेव्हा परत घटनास्थळी जाऊन त्या प्रवाशी महिलेचा शोध घेऊन सुद्धा काही माहिती मिळाली नाही. रिक्षा चालक नंदू चव्हाण आणि रिक्षा मालक वकील अहमद बागवान यांनी ती सोन्याची अंगठी पोलिसांच्या स्वाधीन केली.
advertisement
रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा पाहून पोलिस उपआयुक्त मुख्यालय हसन गौहर यांच्या हस्ते रिक्षाचालक नंदू चव्हाण यांना शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच शहर वाहतूक शाखा दक्षिण येथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक रविद्रनाथ भंडारे यांच्या कडून 1 हजार रुपये रोख बक्षिस पोलीस उप आयुक्त मुख्यालय हसन गौहर यांच्या हस्ते देण्यात आले. ज्या प्रवासी महिलेची 1 लाख रुपये किमतीची सोन्याची मौल्यवान अंगठी असेल त्यांनी खरेदी केलेली बिल पावती आणून आपली वस्तू घेऊन जावे, असे आवाहन पोलीस उपआयुक्त मुख्यालय हसन गौहर यांनी केले आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
July 10, 2025 11:37 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Solapur News: प्रामाणिकपणाचे कौतुक! रिक्षाचालकाने लाखाचे दागिने केले परत, पोलिसांकडून रिवॉर्ड!