सोलापुरात 2 दिवसात 2 हत्या, अनैतिक संबंधातून भयंकर कांड, कोयत्याने केले वार

Last Updated:

दसऱ्याच्या पूर्वसंध्येला सोलापूरात दोन हत्येच्या घटना घडल्या आहेत. अनैतिक संबंधाच्या संशयातून दोन जणांनी आपापल्या पत्नीची हत्या केली आहे.

News18
News18
प्रीतम पंडित, प्रतिनिधी सोलापूर: सोलापूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या विविध घटना समोर येत आहेत. अनेक दसऱ्याच्या पूर्वसंध्येला सोलापूरात दोन हत्येच्या घटना घडल्या आहेत. अनैतिक संबंधाच्या संशयातून दोन जणांनी आपापल्या पत्नीची हत्या केली आहे. लागोपाठ दोन हत्याकांड घडल्याने सोलापूर जिल्हा हादरला आहे. यातील पहिला घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद गावात घडली, तर दुसरी घटना मोहोळ तालुक्यातील पिंपरी इथं घडली. आरोपींनी कोयता आणि खुरप्याने गळा आवळून खून केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या दोन्ही घटना मंगळवार आणि बुधवारी घडल्या आहेत. ऐन नवरात्र आणि दसऱ्याच्या काळात या दोन्ही घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पहिल्या घटनेत, दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद येथे पतीने दारुच्या नशेत पत्नीवर चारित्र्याचा संशय घेतला. यानंतर दोघांमध्ये वाद झाल्यानंतर आरोपीनं पत्नीच्या डोक्यात पहारीने वार केले आणि खुरप्याने गळा चिरून हत्या केली. अंबिका अशोक आंबीकर असं मृत पत्नीचे नाव तर अशोक आंबीकर असं आरोपीचं नाव आहे.
advertisement
पत्नीची हत्या केल्यानंतर पती अशोक याने देखील आत्महत्या करून जीवन संपवलं आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर दारूची नशा उतरताच कारवाईच्या भीतीने अशोकने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी मंद्रूप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.
दुसरी घटना, मोहोळ तालुक्यातील पिंपरी गावात घडली आहे. इथं एका पतीने अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीच्या गळ्यावर कोयत्याने गळ्यावर वार केले आहेत. हा हल्ला इतका भयंकर होता की पत्नीचा जागीच मृत्यू झाला. सुनिता दर्शन वाणी असं हल्ल्यात मृत्यू पावलेल्या पत्नीचे नाव आहे. तर दर्शन वाणी असं आरोपी पतीचं नाव आहे. हे दोघेही परभणी येथून मोहोळला शेतात मकवान कापण्याचं काम करण्यासाठी आले होते. मोहोळ पोलीस ठाण्यात दर्शन वाणी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
सोलापुरात 2 दिवसात 2 हत्या, अनैतिक संबंधातून भयंकर कांड, कोयत्याने केले वार
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement