HSRP नंबर प्लेट बसवलेले नाही, परिवहन विभागाचा मोठा निर्णय, होऊ शकते ही कारवाई

Last Updated:

वाहनांना एचएसआरपी म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवणे बंधनकारक केले आहे. तरीदेखील काही जुन्या वाहनधारकांनी हे नंबर प्लेट बसवलेले नाही.

+
News18

News18

सोलापूर : वाहनांना एचएसआरपी म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवणे बंधनकारक केले आहे. तरीदेखील काही जुन्या वाहनधारकांनी हे नंबर प्लेट बसवलेले नाही. एकूण वाहनांच्या 8 टक्के वाहनधारकांनी याची अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे आता जुन्या वाहनांची खरेदी किंवा विक्री करत असताना एचएसआरपी नंबर प्लेट नसल्यास ते वाहन ट्रान्स्फर न करण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन कार्यालयाने घेतला आहे. या संदर्भात अधिक माहिती सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आसिफ मुलाणी यांनी दिली.
केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 50 नुसार वाहनांस एचएसआरपी बसविण्याची तरतूद केली आहे. दिनांक 01 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व नवीन वाहनांना हे नंबर प्लेट बसवणे आवश्यक आहेउच्च सुरक्षा नंबर प्लेट नसल्यास संबंधित वाहन मालकांना आरटीओ कार्यालयात काम करताना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. योग्यता प्रमाणपत्र नूतणीकरण, परवानाविषयक कामकाज व खासगी संवर्गातील वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्रनोंदणी प्रमाणपत्र जारी करणेनूतनीकरण कामकाज वगळून वाहन हस्तांतरणवाहनांमध्ये बदल करणेही कामे एचएसआरपी बसविल्याशिवाय केली जाणार नाहीत. त्यामुळे सध्या जुने वाहन खरेदी किंवा विक्री करणे कठीण झाले आहे.
advertisement
सोलापूरच्या परिवहन विभागांतर्गत 1 एप्रिल 2019 पूर्वीची सुमारे 9 लाख वाहने आहेतयातील फक्त 72 हजार 543 या जुन्या वाहनांनीच एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यात आली आहे. अन्य वाहनांनी नंबर प्लेट बसवला नाहीप्रत्येक जुन्या वाहनांना एचएसआरपी बसवणे आवश्यक आहे.
advertisement
शासनाने 15 ऑगस्ट 2025 पर्यंत एचएसआरपी बसविण्याची मुदत वाढवून देण्यात आली आहेही शेवटची संधी असून लवकरात लवकर वाहन मालकांनी गाड्यांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घ्यावीअन्यथा वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आसिफ मुलाणी यांनी दिली.
मराठी बातम्या/सोलापूर/
HSRP नंबर प्लेट बसवलेले नाही, परिवहन विभागाचा मोठा निर्णय, होऊ शकते ही कारवाई
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement