NCP : ...तेव्हा एकत्र यायचा निर्णय घेऊ, शरद पवारांच्या विधानानंतर सुप्रिया सुळेंनी सस्पेन्स वाढवला!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
शरद पवारांनी गुरूवारी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र यायच्या शक्यतांबाबत सूचक विधान केलं. या विधानाच्या एका दिवसामध्येच अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट झाली आहे.
अभिजीत पोते, प्रतिनिधी
पुणे : शरद पवारांनी गुरूवारी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र यायच्या शक्यतांबाबत सूचक विधान केलं. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसना एकत्र यायचा निर्णय सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांना घ्यायचा आहे, असं शरद पवार म्हणाले. शरद पवारांच्या या विधानावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार आणि सुप्रिया सुळे आज पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त एकाच व्यासपीठावर होते, त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली.
advertisement
'आम्ही एक कुटुंब म्हणून सोबत असतो. राजकारणात मतभेद असावेत पण मनभेद नसावेत. 8 खासदार काय निर्णय घेतील. आधी लग्न कोंढाण्याचं, सध्या राष्ट्र नंतर महाराष्ट्राचा निर्णय होईल', असं विधान करून सुप्रिया सुळेंनी या चर्चांचा सस्पेन्स आणखी वाढवला आहे.
'आमचे आठही खासदार उत्तर परफॉर्म करणारे खासदार आहेत. 8 खासदार एकत्रित आहेत, जो निर्णय घेतला जाईल तो एकत्रित घेतला जाईल. मला आधी साहेबांना भेटावं लागेल. जेव्हा भेट होईल तेव्हा साहेबांशी चर्चा करेन. साहेब आणि जयंत पाटील यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, पण सध्या देश पहिला आहे, त्यानंतर हा निर्णय घेतला जाईल', असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
advertisement
काय म्हणाले होते शरद पवार?
पत्रकारांसोबत अनौपचारिक गप्पा मारत असताना शरद पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येण्याबाबत भाष्य केलं. सगळ्यांची विचारधारा एक आहे त्यामुळे दोन्ही पक्ष एकत्र आले तर आश्चर्य वाटायला नको. याचा निर्णय अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी घ्यायचा आहे. त्यांना निवडणुका लढवायच्या आहेत. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घ्यायचा आहे. मी निवडणूक लढणार नाही त्यामुळे मी या प्रक्रियेत नसल्याचेही पवारांनी स्पष्ट केले.
advertisement
काही आमदार अजित पवार यांच्यासोबत जाण्यासाठी इच्छुक आहेत. त्याबाबतचा निर्णय हा जयंत पाटील आणि सुप्रिया सुळेंनी घ्यावा असंही शरद पवारांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे यांची खासदारांसोबतही चर्चा झाल्याची माहिती आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
May 09, 2025 11:36 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
NCP : ...तेव्हा एकत्र यायचा निर्णय घेऊ, शरद पवारांच्या विधानानंतर सुप्रिया सुळेंनी सस्पेन्स वाढवला!