Premanand maharaj Health : प्रेमानंद महाराजांच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट, सीटी स्कॅन रिपोर्टमध्ये काय आलं?

Last Updated:

महाराजांच्या प्रकृतीविषयी जाणून घेण्यासाठी भक्त दिवसभर सोशल मीडियावर किंवा त्यांच्या आश्रमाच्या माध्यमातून अपडेट मिळवण्याची वाट पाहत असतात.

premanand maharaj
premanand maharaj
मुंबई : असं म्हटलं जातं की भक्तांसाठी त्यांचा गुरु किंवा साधू हा देवासारखाच असतो. त्यामुळे जेव्हा त्यांच्या आराध्य संतांच्या तब्येतीत थोडीशीही बिघाडाची बातमी समजते, तेव्हा भक्तांचं मन अस्वस्थ होतं. असंच काहीसं सध्या वृंदावनमध्ये पाहायला मिळतंय. कारण राधाभक्तिरसावतार संत श्री प्रेमानंदजी महाराज यांच्या तब्येतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.
महाराजांच्या प्रकृतीविषयी जाणून घेण्यासाठी भक्त दिवसभर सोशल मीडियावर किंवा त्यांच्या आश्रमाच्या माध्यमातून अपडेट मिळवण्याची वाट पाहत असतात. मंगळवारी सकाळी जेव्हा ते बिरला मंदिराजवळील एका डायग्नॉस्टिक सेंटरमध्ये तपासणीसाठी पोहोचले, तेव्हा भक्तांची प्रचंड गर्दी जमली. प्रेमानंदजींच्या दर्शनासाठी इतकी लोकं आली की पोलिसांना कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराजांना काही दिवसांपासून पोटात सूज आणि वेदना जाणवत आहेत. याच तपासणीसाठी त्यांना सीटी स्कॅनसाठी या सेंटरमध्ये आणण्यात आलं. जरी त्यांना अतिशय गुप्तपणे आणण्यात आलं होतं, तरीही ही बातमी चाहत्यांपर्यंत पोहोचताच शेकडो लोक बाहेर जमले.
advertisement
अधिकृतरीत्या त्यांच्या सीटी स्कॅन रिपोर्टविषयी काहीही सांगितलं गेलं नाही आहे. सुरक्षा लक्षात घेऊन त्यांना सेंटरच्या मागच्या दरवाजातून बाहेर काढण्यात आलं. मात्र, मंगळवारी त्यांच्या ‘भजन मार्ग’ या यूट्यूब चॅनेलवर त्यांच्या संवादाचा नवा व्हिडिओ अपलोड करण्यात आला. यात त्यांच्या चेहऱ्यावर आणि हातावर पुन्हा सूज दिसून येते, तसेच त्यांच्या आवाजातही त्या अस्वस्थतेचा थोडा परिणाम जाणवतो.
advertisement
याआधी जेव्हा त्यांच्या प्रकृतीबाबत चर्चा झाली होती, तेव्हा राधा केली कुंज आश्रमाकडून सांगण्यात आलं होतं की प्रेमानंदजींची तब्येत स्थिर आहे आणि ते हळूहळू बरे होत आहेत. सध्या ते वृंदावनमधील आश्रमातच नियमित डायलिसिस उपचाराखाली आहेत आणि आश्रमाच्या मते, त्यांची प्रकृती नियंत्रणात आहे.
view comments
मराठी बातम्या/देश/
Premanand maharaj Health : प्रेमानंद महाराजांच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट, सीटी स्कॅन रिपोर्टमध्ये काय आलं?
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement