Tejasvee Ghosalkar Join BJP: तेजस्वी घोसाळकरांचा अखेर भाजपात प्रवेश, चारच ओळी बोलल्या, 'शिवसेनेने मला...'

Last Updated:

Tejasvee Ghosalkar Join BJP: शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी अखेर भाजपात प्रवेश केला आहे. तेजस्वी घोसाळकर या ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका आहेत.

तेजस्वी घोसाळकरांचा भाजपात प्रवेश, चारच ओळी बोलल्या, 'शिवसेनेने मला...'
तेजस्वी घोसाळकरांचा भाजपात प्रवेश, चारच ओळी बोलल्या, 'शिवसेनेने मला...'
विजय वंजारा, प्रतिनिधी, मुंबई: शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी अखेर भाजपात प्रवेश केला आहे. तेजस्वी घोसाळकर या ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका आहेत. तर, ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांच्या सून आहेत. तेजस्वी घोसाळकर यांचा राजीनामा हा स्थानिक पातळीवर ठाकरे गटाला धक्का मानला जात आहे. तर, भाजपची ताकद वाढणार आहे. भाजपात प्रवेश केल्यानंतर तेजस्वी घोसाळकर यांनी माध्यमांशी संवाद साधला.
आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. आज, भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम, विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपात प्रवेश केला. मुंबईत भाजप सरकारने केलेली विकास कामे पाहुन, मुंबईच्या विकासासाठी आणि हिंदुत्वासाठी तेजस्वी घोसाळक भाजपात प्रवेश करत असल्याचे भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी सांगितले.
advertisement

तेजस्वी घोसाळकर काय म्हणाल्या?

तेजस्वी घोसाळकर यांनी म्हटले की, हा निर्णय कठीण आहे. मनात खूप गोष्टी आहेत, खूप काही बोलायचं आहे. ज्यांनी ओळख दिली, तो पक्ष सोडताना, परिवाला सोडताना खूप दु:ख होत आहे. प्रभागातील विकास कामांसाठी हा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात माझ्या प्रभागात विकास कामे, अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचा संथगतीने सुरू असलेल्या सीबीआय तपासाला वेग येईल आणि आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा असल्याचे तेजस्वी घोसाळकरांनी सांगितले.
advertisement

तेजस्वी घोसाळकरांचा प्रभाग आरक्षित...

मुंबई महापालिका निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर घोसाळकर यांचा प्रभाग आरक्षित झाला होता. त्यानंतर त्यांनी प्रभाग आरक्षित झाल्याने नाराजी व्यक्त केली होती. मात्र, आपण पक्षाचे काम जोमाने सुरू ठेवणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर काही दिवसांमध्ये तेजस्वी घोसाळकरांच्या पक्षांतराची चर्चा सुरू झाली होती. अखेर आज सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचा राजीनामा देत असल्याचे सांगितले.
advertisement
आयुष्यात असा क्षण कधी येईल, आणि मला असे शब्द लिहावे लागतील, याची कल्पनाही मी कधी केली नव्हती. आज मन जड आहे. शब्द अपुरे पडत आहेत, पण तरीही हा संवाद आवश्यक असल्याचे तेजस्वी घोसाळकर यांनी म्हटले.

इतर संबंधित बातमी:

view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Tejasvee Ghosalkar Join BJP: तेजस्वी घोसाळकरांचा अखेर भाजपात प्रवेश, चारच ओळी बोलल्या, 'शिवसेनेने मला...'
Next Article
advertisement
Tejasvee Ghosalkar Join BJP: तेजस्वी घोसाळकरांचा अखेर भाजपात प्रवेश, चारच ओळी बोलल्या, 'शिवसेनेने मला...'
तेजस्वी घोसाळकरांचा अखेर भाजपात प्रवेश, चारच ओळी बोलल्या, 'शिवसेनेने मला...'
  • तेजस्वी घोसाळकरांचा अखेर भाजपात प्रवेश, चारच ओळी बोलल्या, 'शिवसेनेने मला...'

  • तेजस्वी घोसाळकरांचा अखेर भाजपात प्रवेश, चारच ओळी बोलल्या, 'शिवसेनेने मला...'

  • तेजस्वी घोसाळकरांचा अखेर भाजपात प्रवेश, चारच ओळी बोलल्या, 'शिवसेनेने मला...'

View All
advertisement