Bolero मधून आले घरातून उचललं, मारहाण केली अन्.. शहापूरमध्ये जमिनीवरून रक्तरंजित राडा
- Published by:Prachi Amale
Last Updated:
सायंकाळी 6 वाजता चार मारेकरी बोलेरे गाडीमधून आले आणि रामदास चंदर गोरखने याला त्याच्या घरातून बोलेरो गाडी टाकून घेऊन गेले.
सुनील घरत, प्रतिनिधी
ठाणे क्राईम न्यूज: शहापूर येथून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आलाआहे. जमिनीच्य वादातून एका ४७ वर्षीय व्यक्तीचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झालं आहे. बिरवाडीमधील व्यक्तीचा चौघा जणांनी अपहरण करत खून केल्याचे समोर आले आहे.
समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, जमिनीच्या वादातून 7 वर्षीय रामदास चंदर गोरखने,राहणार प्रधानपाडा ग्रामपंचायत बिरवाडीमधील व्यक्तीची चौघा जणांनी हत्या केल्याचे समोर आले आहे. शहापूर पोलीस स्टेशनमध्ये घटने संदर्भात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून एका मारेकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिघे जण फरार आहेत.
advertisement
बोलेरे गाडीतून केलं अपहरण
काल सायंकाळी 6 वाजता चार मारेकरी बोलेरे गाडीमधून आले आणि रामदास चंदर गोरखने याला त्याच्या घरातून बोलेरो गाडी टाकून घेऊन गेले. रात्री रामदास चंदन गोरखने यांचा मुलगा मोहन रामदास गोरखने यांनी व इतर नातेवाईकांनी शोधाशोध केली. मात्र रामदास गोरखणे हे घरी आलेच नाही. त्यानंतर मुंबई -नाशिक महामार्गलगत असलेल्या खर्डी विभागातील उंबरखांड हद्दीमध्ये रात्री तीन वाजता त्यांचा मृतदेह जखमी अवस्थेत आढळून आला.
advertisement
एक जण ताब्यात तीन फरार
मृतदेह आढळल्यानंतर पोलिस्टेशन मध्ये तक्रार केली. असून नातेवाईकांनी दोन मारेकऱ्यांना ओळखले आहे. सुनिल निमसे (रा. उंबरखंड) आणि योगेश सोनवणे (रा. लाहे) या गावामधील आहेत चौघांपैकी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तीन जण फरार आहेत. मृतदेहाच्या डाव्या कानाच्या पाठीमागे फक्त एक छोटीशी जखम आहे. त्यामुळे मारेकऱ्यांनी हत्येसाठी कोणते हत्यार वापरले अद्याप समोर आले नाही.
advertisement
मृतदेह फॉरेन्सक लॅबला पाठवला
हत्येचा तपास करण्यासाठी मृतदेह फॉरेन्सिक लॅब मुंबई येथील जे जे रुग्णालयात पोस्टमार्टम करण्यासाठी पाठविण्यात आला आहे. घटने संदर्भात शहापूर पोलीस उपविभागीय अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या टीममार्फत पुढील तपास सुरू आहे.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
September 16, 2025 4:16 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Bolero मधून आले घरातून उचललं, मारहाण केली अन्.. शहापूरमध्ये जमिनीवरून रक्तरंजित राडा