Crime News : महिलेला रिक्षात ओढून नेत सामूहिक अत्याचार; तब्बल 22 वर्षानंतर तो जेरबंद
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Crime News : बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला तब्बल 22 वर्षानंतर अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे.
मिरा-भाईंदर, (राजा मयाल, प्रतिनिधी) : कायद्याचे हात लांब असतात अशी म्हण प्रसिद्ध आहे. गुन्हेगार कितीही चलाख असला तरी एक ना एक दिवस त्याच्या पापाचा घडा भरतोच. एका गंभीर गुन्ह्यातील आरोपी तब्बल 22 वर्षे पोलिसांना हुलकावणी देत होता. अखेर तो पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. या आरोपीवर सामूहीक जबरी संभोग आणि विनयभंग केल्याचा आरोप आहे.
काय आहे घटना?
22 वर्षांपूर्वी 2 जानेवारी 2002 ला चार आरोपींनी मिळून 26 वर्षीय महिलेला आपसात संगनमत करुन जबरदस्तीने अपहरण केलं. तिला रिक्षात कोंबुन नंतर एका रस्त्यावर नेत आळीपाळीने जबरी संभोग केला. तिच्याशी अश्लील चाळे करुन विनयभंग केला. यावेळी तिला बेदम मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. घटनेनंतर महिलेच्या तक्रारीवरून नालासोपारा पोलीस ठाण्यात कलम ३६३, ३७६(२) (जी), ३५४,३४२,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
advertisement
घटनेनंतर आरोपी 22 वर्षे फरार
view commentsयानंतर गुन्ह्याच्या तपासात दोन आरोपींना अटक करुन त्यांच्या विरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले होते. परंतु, आरोपी हा गुन्हा दाखल झाल्यापासुन फरार होता. वरीष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर व संवेदनशील गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेणेबाबत आदेश केले होते. वरील गुन्हा अतिशय गंभीर स्वरुपाचा असल्याने तसेच नमुद गुन्ह्यातील आरोपी शोध घेऊन देखील गेल्या 22 वर्षापासुन फरार होता. अखेर त्याला शिताफीने अटक करण्यात आली आहे.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
July 04, 2024 5:33 PM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Crime News : महिलेला रिक्षात ओढून नेत सामूहिक अत्याचार; तब्बल 22 वर्षानंतर तो जेरबंद


