Coconut Price: नवरात्रीत नारळ खातोय भाव! लहान नारळांची मागणी वाढली, कारण काय?

Last Updated:

Coconut Price: देवीची ओटी भरण्यासाठी आणि धार्मिक विधींसाठी छोटा नारळ जास्त सोयीचा पडतो.

Coconut Price: नवरात्रीत नारळ खातोय भाव! लहान नारळांची मागणी वाढली, कारण काय?
Coconut Price: नवरात्रीत नारळ खातोय भाव! लहान नारळांची मागणी वाढली, कारण काय?
ठाणे: भारतातील धार्मिक कार्यात श्रीफळ म्हणजेच नारळाला अनन्य साधारण महत्त्व आहे. त्यामुळे त्याच्या किमतीत झालेल्या बदलांचा थेट फरक सर्वसामान्य माणसाच्या खिशावर होतो. काही दिवसांपूर्वी झालेल्या गणेशोत्सवात उसळी घेतल्यानंतर पितृपक्षात नारळाची किंमत कमी झाली होती. मात्र, आता नवरात्रौत्सवात नारळाचा भाव पुन्हा वाढला आहे. देवीची ओटी भरण्यासाठी आणि होमहवन करण्यासाठी आकाराने लहान असलेल्या नारळाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे छोट्या नारळाचे दर झपाट्याने वाढले आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नवरात्रीपूर्वी लहान आकाराचा नारळ 20 रुपयांना मिळत होता. सध्या तोच नारळ 30 ते 32 रुपयांपर्यंत मिळत आहे. देवीची ओटी भरण्यासाठी आणि धार्मिक विधींसाठी छोटा नारळ जास्त सोयीचा पडतो. त्यामुळे ग्राहकांकडून या नारळाची मागणी वाढली आहे. लहान नारळाची मागणी जास्त आणि आवक कमी अशी स्थिती आहे. त्यामुळे दर वाढले आहेत.
advertisement
याउलट मोठ्या नारळाचे दर मात्र घसरले आहे. काही दिवसांपूर्वी 50 रुपयांना विकला जाणारा मोठा नारळ सध्या 40 रुपयांना मिळत आहे. दक्षिण भारतातून मोठ्या नारळाचा पुरवठा जास्त आहे. त्या तुलनेने मागणी कमी असल्याने दर घटल्याचं विक्रेत्यांचं म्हणणं आहे.
advertisement
महाराष्ट्रात दक्षिण भारतातून विशेषतः आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांमधून नारळाची आवक होते. महाराष्ट्रातही नारळ उत्पादन होत असले तरी, सणासुदीच्या काळात मागणी वाढल्याने आणि आवक कमी झाल्याने दक्षिण भारतातील राज्यांकडून नारळाची आयात करावी लागते. सध्या मोठ्या नारळांची आवक जास्त आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Coconut Price: नवरात्रीत नारळ खातोय भाव! लहान नारळांची मागणी वाढली, कारण काय?
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement