Thane Metro: वाहतूक कोंडी सुटणार! ठाण्यात लवकरच मेट्रो धावणार, कासारवडवलीत गर्डरची यशस्वी उभारणी

Last Updated:

Thane Metro: ठाणे शहरातील मेट्रोच्या कामाकडे नागरिकांचं खूप दिवसांपासून लक्ष लागून आहे.

Thane Metro: वाहतूक कोंडी सुटणार! ठाण्यात लवकरच मेट्रो धावणार, कासारवडवलीत गर्डरची यशस्वी उभारणी
Thane Metro: वाहतूक कोंडी सुटणार! ठाण्यात लवकरच मेट्रो धावणार, कासारवडवलीत गर्डरची यशस्वी उभारणी
ठाणे: ठाणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ठाणेकरांसाठी लवकरच मेट्रोसेवा सुरू होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) वडाळा ते कासारवडवली मेट्रो 4 मार्गिकेवर (लेन) माजिवडा ते कापूरबावडी या टप्प्यात यशस्वीरीत्या यू गर्डर आणि प्रीटेंशन्ड आय गर्डरची उभारणी केली आहे. त्यामुळे या मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील 88 टक्के काम पूर्ण झालं आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मेट्रो 4 ही 32.32 किलोमीटरची लेन आहे तर मेट्रो 4 अ लेनची लांबी 2.7 किलोमीटर आहे. या दोन्ही लेनवर मिळून 32 स्टेशन्स असतील. पहिल्या टप्प्यात, या दोन्ही मेट्रो लेन मिळून गायमुख ते कॅडबरी जंक्शन या 10.5 किलोमीटर मार्गावर मेट्रो सुरू केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात सुरू होणाऱ्या मेट्रो मार्गावर कॅडबरी जंक्शन, माजिवाडा, कापूरबावडी, मानपाडा, टिकुजीनीवाडी, डोंगरीपाडा, विजय गार्डन, कासारवडवली, गोवनीवाडा आणि गायमुख ही 10 स्टेशन्स असतील.
advertisement
पहिल्या टप्प्यातील मेट्रोचं 88 टक्के कामं पूर्ण झालं असून येत्या 15 दिवसांत चाचणी होण्याची शक्यता आहे. एमएमआरडीएकडून, पहिल्या टप्प्यातील मार्गावर असलेल्या स्टेशन्सची कामं युद्धपातळीवर पूर्ण केली जात आहेत. एमएमआरडीएने डोंगरीपाडा स्टेशन ते गायमुखपर्यंत या मार्गावरील विद्युत वाहिन्या 30 ऑगस्टपासून कार्यान्वित केल्या आहेत. तसेच सोमवारी या मार्गिकेवर पहिल्यांदा गाडी धावली.
advertisement
ठाणे शहरातील मेट्रोच्या कामाकडे नागरिकांचं खूप दिवसांपासून लक्ष लागून आहे. अनेक वर्षांपासून मेट्रोचं काम रखडलं होतं. विविध अडचणींमुळे नागरिकांना वाहतुकीच्या समस्यांना सामोरं जावं लागत होतं. आता मेट्रोचं काम अंतिम टप्प्यात आलं असून लवकरच ठाणेकरांच्या सेवेत मेट्रो दाखल होईल.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Thane Metro: वाहतूक कोंडी सुटणार! ठाण्यात लवकरच मेट्रो धावणार, कासारवडवलीत गर्डरची यशस्वी उभारणी
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement