Uddhav Thackeray: आता मला पश्चाताप होतोय, तेव्हाच अनंत तरेंचं ऐकलं असतं तर... 11 वर्षांनी उद्धव ठाकरेंच्या मनातलं आलं ओठावर
- Published by:Prachi Amale
Last Updated:
अनंत तरेंसारखे राजहंस असते तर आज हे कावळे फडफडले नसते, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.
ठाणे : अनंत तरेंचं ऐकायला हवं होतं आता मला पश्चाताप होतोय असं म्हणत शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरेंनी आपल्या मनातील खंत जाहीर कार्यक्रमात बोलून दाखवली आहे. ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये आज आठवणीतले अनंत तरे चरित्र पुस्तकाचे प्रकाशन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शिवसेना (ठाकरे गट) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी उद्धव ठाकरेंनी अनंत तरेंच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तसेच ठाण्याच्या वाहतूक कोंडीवरून देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर सडकून टीका केली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, निष्ठेची मुखवटे लावलेली माणसं आपल्या आजूबाजूला असतात त्यामुळे खरी माणसं ओळखताना आपली गल्लत होते. आनंद तरेंचं तेव्हा ऐकायला होतं आता मला या गोष्टीचा पश्चाताप होतोय. तेव्हा जर मी ऐकलं असतं तर दिल्लीत जाऊन हंबरडा फोडणारी आणि लोटांगण घालणारी माणसे आज दिसली नसती.
२०१४ साली काय म्हणाले होते अनंत तरे?
advertisement
२०१४ सालची निवडणुकीवेळी शिवसेना संपवण्याचा डाव होता. २०१४ साली सगळं ठरलं होती उद्या शेवटचं दिवस तेव्हा भाजपने युती तोडली मग लढायचं कस हा प्रश्न पडला होता. तेव्हा तरे साहेबांनी अपक्ष अर्ज भरला होता. तरे साहेब कोणाचही ऐकायला तयार नव्हते, त्यावेळी आत्ताचे लोटांगणवीर मातोश्रीवर आले आणि म्हणाले साहेब काही तरी कारा आपली सीट जाईल... मग मी तरेंशी बोललो त्यावेळी ते मला बोलले साहेब हाच आपल्याला उद्या दगा दिल्याशिवाय राहणार नाही. आज तेच झाले. तरेंसारखे राजहंस पुढे आले असते तर आज हे कावळे फडफडले नसते, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
advertisement
आपण म्हैसासूरचा वध करु: उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, शिवसेनेवर जशी संकटे आली तशी तरे कुटुंबावर अनेक संकटे आली पण ते शिवसेनेसोबत राहिले. बघू अजून कोण आपल्याला आडवं येतं त्यांना आडवे करून पुढे जाऊ.. आपली सर्व आयुधे काढून घेतली आहेत पण आईचा आशिर्वाद आपल्यासोबत आहे त्यामुळे आपण म्हैसासूरचा वध करु... ज्यांनी तुम्हाला जन्म दिला त्या शिवसेना आईचा घात केला त्यांना ही तसेच मिळेल.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 11, 2025 7:54 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Uddhav Thackeray: आता मला पश्चाताप होतोय, तेव्हाच अनंत तरेंचं ऐकलं असतं तर... 11 वर्षांनी उद्धव ठाकरेंच्या मनातलं आलं ओठावर