Uddhav Thackeray Speech : 'ती गुंडगिरी असेल तर आम्ही गुंड आहोत...', उद्धव ठाकरेंचा पलटवार

Last Updated:

Uddhav Thackeray Speech: उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुंडगिरीवरून केलेल्या वक्तव्यावर टीका केली.

'ती गुंडगिरी असेल तर आम्ही गुंड आहोत...', उद्धव ठाकरेंचा पलटवार
'ती गुंडगिरी असेल तर आम्ही गुंड आहोत...', उद्धव ठाकरेंचा पलटवार
मुंबई: त्रिभाषा सक्तीचा आदेश राज्य सरकारने रद्द झाल्यानंतर आज ठाकरे बंधूच्या पुढाकारातून विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. वरळीतील NSCI डोममध्ये हा विजयी मेळावा पार पडला. या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू जवळपास 19 वर्षाच्या कालावधीनंतर राजकीय मंचावर एकत्र दिसले. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुंडगिरीवरून केलेल्या वक्तव्यावर टीका केली.
विजयी मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "बऱ्याच वर्षानंतर राज आणि माझी राजकीय व्यासपीठावर भेट आहे. सन्मानिय राज ठाकरे असा उल्लेख करतो. राज यांनी अतिशय चांगली मांडणी केली आहे. आज आजच्या भाषणा पेक्षा आमच एकत्र दिसणं महत्वाचं आहे. आमच्या दोघांतील 'अंतरपाट' अनाजी पंतांनी दूर केला. आता अक्षता टाकायची गरज नाही. एकत्र आलो आहे एकत्र राहण्यासाठी आलो आहेत, असे उद्धव यांनी म्हटले. उद्धव यांचे हे वक्तव्य म्हणजे मनसेसोबतच्या युतीचे स्पष्ट संकेत असल्याचे म्हटले जात आहे.
advertisement

त्याला गुंड म्हणत असाल तर आम्ही गुंड आहोत...

उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, महाराष्ट्रात मराठी माणूस न्याय मागत असेल आणि तुम्ही त्याला गुंड म्हणत असाल तर आम्ही गुंड आहोत. देवेंद्र फडणवीस यांच वक्तव्य म्हणजे मला सका पाटलांची आठवण येते, त्यावेळी काँग्रेस सत्तेवर होती. मुंबई आपल्या हक्कांची आहे लढलो आणि आपण घेतली. काश्मीर मध्ये 370 कलम हटवायला शिवसेनेने पाठिंबा दिला होता. एक देश, एक भाषा म्हणून हिंदी सक्ती आम्ही लागू करून देणार नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
advertisement
हिंदी सक्तीचा निर्णय हा उद्धव ठाकरे यांचा असल्याचे म्हणता मी एवढं काम करत होतो तर सरकार पाडलं कशाला? असा सवाल ही त्यांनी केला. मराठी माणूस मुंबई बाहेर नेला असं तुम्हाला वाटत असेल तर 2014 नंतर मुंबईतील उद्योगधंदे गुजरातला गेले कसे? तुम्ही आमच्यात गद्दरी करवली आणि आमच सरकार पाडलं. तुमचे मालक तिकडे गुजरातला बसले आहेत दोन व्यापारी त्यांच्यासाठी तुम्ही करत आहात. आम्ही एकत्र येणार म्हंटल की, हे भांडण लावतील यांचा म मराठीचा नाही महानगरपालिकेचा आहे, असं म्हणतात अरे महापालिका नाही आमचा म महाराष्ट्राचा असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
advertisement

भाजप ही अफवांची फॅक्टरी...

उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, भाषेवरुन जेव्हा विषय निघतो, तेव्हा वरवर धरुन चालणार नाही. या नतद्रष्टांचा आम्ही अनुभव घेतला आहे. वापरायचं आणि फेकून द्यायचं असे वागतात. आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार आहोत. आजपर्यंत वापर करुन घेतला. अरे डोक्यावर शिवसेना प्रमुख नसते तर तुम्हाला महाराष्ट्रात कोण ओळखत होतं. कोणत्या भाषेत बोलत होतात. अगदी सगळ्यांची शाळा काढली, मोदींची शाळा कोणती? सगळ्यात उच्च शिक्षित आहेत. भाजप ही अफवांची फॅक्ट्री आहे. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं, तुम्ही काय आम्हाला हिंदुत्व शिकवता असा सवाल उद्धव यांनी भाजपला केला.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Uddhav Thackeray Speech : 'ती गुंडगिरी असेल तर आम्ही गुंड आहोत...', उद्धव ठाकरेंचा पलटवार
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement