Uddhav Thackeray : 'विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढली तर...', ठाकरेंच्या संपर्कप्रमुखांसोबतच्या बैठकीत काय झालं?
- Published by:Shreyas
Last Updated:
लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राज्यभरातील 288 विधानसभा संपर्कप्रमुखांची बैठक शिवसेना भवनामध्ये झाली. यामध्ये प्रामुख्याने संपर्कप्रमुखांकडून विधानसभा निहाय माहिती उद्धव ठाकरेंनी घेतली.
उदय जाधव, प्रतिनिधी
मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राज्यभरातील 288 विधानसभा संपर्कप्रमुखांची बैठक शिवसेना भवनामध्ये झाली. यामध्ये प्रामुख्याने संपर्कप्रमुखांकडून विधानसभा निहाय माहिती उद्धव ठाकरेंनी घेतली. आठवडाभरात या सर्व विधानसभा संपर्क प्रमुखांना आपापल्या विधानसभेतील अहवाल सादर करण्याच्या सूचना उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.
विधानसभा निहाय पक्षाची ताकद, संघटनात्मक बांधणी, लोकसभा निकालात विधानसभेमध्ये मिळालेलं मताधिक्य, या सगळ्यांचा अहवाल विधानसभा संपर्कप्रमुखांना आठवड्याभरात सादर करायचा आहे.
advertisement
महाविकासआघाडीमध्ये ज्या विधानसभेमध्ये शिवसेना ठाकरे गटाची ताकद आहे, त्या जागा शिवसेना ठाकरे गट लढवेल. महाविकासआघाडीमध्ये जरी निवडणूक लढवली जाणार असली तरी 288 जागांची तयारी करण्याच्या सूचना उद्धव ठाकरेंनी आपल्या विधानसभा संपर्कप्रमुखांना केल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून आपण मित्रपक्षांसोबत अथवा स्वतंत्र विधानसभा लढली तर काय होईल? याचा अहवाल उद्धव ठाकरेंनी मागवला आहे. विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाला अनुकूल आहे का? असल्यास उमेदवार कोण असावा? तसंच संभाव्य विजयाचं समीकरण कसं असेल? याबाबतही ठाकरेंनी अहवाल मागवला आहे. त्याचप्रमाणे लोकसभेमध्ये स्वत:च्या उमेदवाराचे तसंच मित्रपक्षाच्या उमेदवाराचे पदाधिकारी यांनी काम केलं की नाही? याबाबतचा अहवालही ठाकरेंनी मागवला आहे.
advertisement
विधानसभा संपर्कप्रमुख असा बनवणार अहवाल
1 लोकसभा निवडणूक २०२४ चे विधानसभा मतदारसंघ निहाय निकाल.
2 यादीप्रमाणे पूर्ण बुथप्रमुख होते का? न होण्याची कारणे, असल्यास कार्यरत होते का?
3 शिवसेना उमेदवाराचे काम महाविकास आघाडीमधील मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केले का?
4 महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे काम शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केले का?
5 सदर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेस अनुकूल आहे का? असल्यास संभाव्य उमेदवार कोण असावा?
advertisement
6 संभाव्य विजयाचे समिकरण कसे असेल?
7 फक्त शिवसेना लढली तर काय होईल?
8 मतदारसंघ शिवसेनेस अनुकुल नसल्यास, आघाडीत कोणत्या पक्षास द्यावा, उमेदवार कोण असू शकतो?
9 BLA एजंटचे निवडणूक कार्यालयात रजिस्ट्रेशन झाले आहे का? निवडणूक आयोगाची ओळखपत्रे आपल्याकडे आहेत का? नसल्यास त्वरित करुन घ्यावे.
10 लोकसभा निवडणूक 2024 आपला अभिप्राय थोडक्यात ?
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 12, 2024 4:59 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Uddhav Thackeray : 'विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढली तर...', ठाकरेंच्या संपर्कप्रमुखांसोबतच्या बैठकीत काय झालं?


