CM Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी माझे 1000 रुपये वाचवले, CM फडणवीसांनी असं का म्हटले?

Last Updated:

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांनी माझे 1000 रुपये वाचवले असल्याची प्रतिक्रिया दिली.

उद्धव ठाकरेंनी माझे 1000 रुपये वाचवले, CM फडणवीसांनी असं का म्हटले?
उद्धव ठाकरेंनी माझे 1000 रुपये वाचवले, CM फडणवीसांनी असं का म्हटले?
मुंबई: दसरा मेळाव्यातील राजकीय आरोप-प्रत्यारोप झाल्यानंतर आता राजकीय शिमगा सुरू झाला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी पार्क मैदानावरील मेळाव्यातील भाषणात भाजपवर टीका करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला खडा सवाल केला होता. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांनी माझे 1000 रुपये वाचवले असल्याची प्रतिक्रिया दिली.
मुंबईत सायबर जागरूकता महिना कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. यावेळी अपर मुख्य सचिव इकबाल सिंह चहल, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, अभिनेता अक्षय कुमार, अभिनेत्री राणी मुखर्जी, आयआयटी मुंबईचे प्रा. मंजेश हनवाल हे देखील उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी सायबर सुरक्षा अधिक गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले. एआयमुळे सायबर गुन्ह्यात वाढ होत असली तरी त्यातून मार्ग काढता येणे शक्य असल्याचे त्यांनी म्हटले.
advertisement

उद्धव ठाकरेंनी 1000 रुपये वाचवले...

मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेबाबत विचारणा केल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले की, मी उद्धव ठाकरे यांचे आभार मानतो. उद्धव यांनी माझे 1000 रुपये वाचवले. मी आवाहन केलं होतं की त्यांच्या भाषणात विकासाचा मुद्दा दाखवा आणि एक हजार रुपये मिळवा. मी भाषण ऐकले नाही. मात्र, काही पत्रकारांना त्यांनी काही विकासावर भाष्य केले का, याची विचारणा केली. त्यावर त्यांनी नाही असे उत्तर दिले. त्यामुळे माझे 1000 रुपये उद्धव यांनी वाचवले असल्याचा टोला मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला. सीएम फडणवीस यांनी पुढे म्हटले की, एखादी व्यक्ती हताश, निराश झाली की काहीही बडबड करते. त्यामुळे सूज्ञ माणसांनी त्यांच्याकडे लक्ष द्यायचे नसते. उद्धव ठाकरे यांचे भाषण हे एकतर स्वगत असते. आता, त्यांचे स्वगत ऐकायला माणसं देखील नव्हती. त्यांच्यावेळी मैदान रिकामं होतं, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
advertisement

विरोधकांनी पूराच्या संकटावरून राजकारण थांबवावं...

मराठवाड्यासह राज्यात झालेल्या अतिवृष्टीच्या मुद्यावर विरोधकांकडून सरकारवर टीका सुरू आहे. यावर बोलताना मुख्यमंत्र्‍यांनी सांगितले की, आम्ही सर्वपक्षीय बैठक बोलावण्यासाठी तयार आहोत. मात्र, ते राजकारण दूर ठेवणार आहेत का असा सवालही त्यांनी केला. विरोधकही अनेक वर्ष सत्तेत होते. त्यावेळी त्यांनी अशा स्थितीच्या वेळी काय निर्णय घेतले, कोणते जीआर काढले असा सवाल त्यांनी केला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
CM Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी माझे 1000 रुपये वाचवले, CM फडणवीसांनी असं का म्हटले?
Next Article
advertisement
Eknath Shinde Ambernath Nagar Parishad Result: अंबरनाथमध्ये शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? समोर आली १० कारणे....
शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं
  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

View All
advertisement