वाल्मीकला जेलमध्ये स्पेशल चहा, झोपायला खास सोय, तुरुंगवारी घडलेल्या रणजीत कासलेचा आरोप

Last Updated:

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडवर बीडचे बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले याने खळबळजनक आरोप केले आहेत.

News18
News18
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडवर बीडचे बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले याने खळबळजनक आरोप केले आहेत. वाल्मीकला बीडच्या कारागृहात व्हीआयपी ट्रिटमेंट मिळत असल्याचा दावा त्याने केला आहे. कासलेनं शनिवारी याबाबतच एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पुन्हा एकदा वाल्मीक कराडला तुरुंगात मिळणाऱ्या व्हिआयपी ट्रीटमेंटची चर्चा सुरू झाली आहे.
वाल्मीक कराडला तुरुंगात स्पेशल चहा दिला जातो, त्याला चांगल्या चपात्या दिल्या जातात. स्वतः सह तो इतर कैद्यांच्या नावावर २५ हजारांची खरेदी कारागृहातील कँटीनमधून करत असल्याचा आरोप बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक रणजित कासले याने केला आहे. शनिवारी त्याने सोशल मीडियातून याबाबतचा व्हिडिओ शेअर केला. साबयर पोलीस ठाण्यात कार्यरत असताना गुजरातमध्ये जाऊन आरोपींशी आर्थिक तडजोड केल्याच्या आरोपामुळे कासलेला निलंबित केले होते. नंतर त्याच्यावर बडतर्फीची कारवाई झाली. त्याला आठवडाभरापूर्वी जामीन मिळाला. जामीन मिळाल्यानंतर शनिवारी त्याने व्हिडिओ शेअर करत आरोपसत्र सुरु ठेवले.
advertisement
कासले यांच्या म्हणण्यानुसार, बीड कारागृहात त्याला सुरुवातीला ठेवले होते. तिथे वाल्मीक कराडला इतर कैद्यांपेक्षा व्हीआयपी वागणूक मिळत आहे. त्याला कपातून स्पेशल चहा दिला जातो. होता. च्यासाठी चांगल्या दर्जाच्या चपात्याही तयार केल्या जात आहेत. इतर कैद्यांना केवळ पांघरण्यासाठी कपडे दिले जातात. तर कराडला पांघरण्याचेच ६ ब्लॅकेट मिळाले असून त्याचा वापर तो गादीसारखा करतो. इतर कैद्यांना कारागृहातील कँटीनमधून खरेदीचा नियम लावला जातो. मात्र कराड हा स्वतः १० हजार तर इतर कैद्यांच्या नावावरही १० ते १५ हजार अशी सुमारे २५ हजारांची खरेदी करतो, असे कासलेने व्हिडिओत म्हटले.
advertisement
मी कारागृहात राहून कराडला मिळणारी व्हीआयपी वागणूक समोर आणेल, या भीतीपोटी मला सुरक्षेचे कारण देत छत्रपती संभाजीनगरला हलवण्यात आले होते, असा आरोपही कासलेनं केला. कराडला इतरत्र हलवण्याची मागणी आपण कारागृहातून अर्जाद्वारे केली होती, असेही कासलेनं व्हिडीओत सांगितले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
वाल्मीकला जेलमध्ये स्पेशल चहा, झोपायला खास सोय, तुरुंगवारी घडलेल्या रणजीत कासलेचा आरोप
Next Article
advertisement
Gold Price Prediction : नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा धक्कादायक अंदाज
नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध
  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

View All
advertisement