नाराजीची दखल घेतली, वर्षा गायकवाडांच्या टीममध्ये १२ नावांचा समावेश, हायकमांडचा निर्णय
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
मुंबई महापालिका निवडणूक व्यवस्थापन व समन्वयासाठी ३४ जणांची समिती स्थापना करण्यात आली होती. पण या यादीत भाई जगताप, खासदार चंद्रकांत हंडोरे आणि नसीम खान यांना स्थान देण्यात आलेले नव्हते.
सुस्मिता भदाणे, मुंबई : मुंबई महापालिकेसाठी काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक व्यवस्थापन आणि समन्वयासाठीच्या यादीत आता माजी मुंबई अध्यक्ष भाई जगताप, खासदार चंद्रकांत हंडोरे आणि माजी आमदार नसीम खान यांचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्या ३४ जणांच्या यादीतून वगळण्यात आलेल्या मुंबईतील नेत्यांना दुसऱ्या यादीत स्थान देण्यात आले आहे.
मुंबई महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक व्यवस्थापन व समन्वयासाठी ३४ जणांची समिती स्थापना करण्यात आली होती. पण या समितीमध्ये माजी मुंबई अध्यक्ष भाई जगताप, खासदार चंद्रकांत हंडोरे आणि नसीम खान यांना स्थान देण्यात आलेले नव्हते. त्यामुळे मुंबई काँग्रेस मधील अंतर्गत वाद समोर येण्याची चिन्हे दिसत होती
advertisement
नाराजीच्या चर्चा सुरू असताना आता पुन्हा मुंबई काँग्रेसकडून आणखी १२ जणांची नावे निवडणूक व्यवस्थापन आणि समन्वयाच्या यादीत टाकण्यात आलेली आहे. नव्याने जाहीर केलेल्या १२ जणांच्या यादीत माजी मुंबई अध्यक्ष भाई जगताप, खासदार चंद्रकांत हंडोरे आणि नसीम खान यांचेही नावे देण्यात आलेली आहेत. वर्षा गायकवाड यांच्या कामाविषयी याच तीन मुंबईतील काँग्रेसच्या नेत्यांनी प्रशचिन्ह उपस्थित केले होते.
advertisement
नव्या समितीत कोण कोण?
चंद्रकांत हंडोरे
भाई जगताप
आरिफ नसीन खान
सुरेश शेट्टी
चरण सिंग सप्रा
काळू बुधेलिया
हीरा देवसी
यशवंत सिंग
राकेश शेट्टी
अवनीश सिंग
शिवाजी सिंग
अँथनी मॅथ्यूज
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 30, 2025 10:09 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नाराजीची दखल घेतली, वर्षा गायकवाडांच्या टीममध्ये १२ नावांचा समावेश, हायकमांडचा निर्णय