Akola : अकोल्यातून खळबळजनक बातमी, वंचितच्या महिला नेत्याच्या नातीचं अपहरण
- Published by:sachin Salve
- Reported by:KUNDAN JADHAV
Last Updated:
शहरातील कृषीनगर भागातल्या एका नामांकित इंग्लिश स्कूल परिसरातून या 12 वर्षीय मुलीच अपहरण झालं आहे.
अकोला : राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले जात आहे. अशातच अकोल्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडीच्या एका माजी बड्या महिला नेत्याच्या नातीचं अपहरण झालं असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे अकोल्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्यात वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडीच्या माजी जिल्हाध्यक्ष मंदाताई वाकोडे यांच्या नातीचं अपहरण झालं असल्याचं समोर आलं आहे. शहरातील कृषीनगर भागातल्या एका नामांकित इंग्लिश स्कूल परिसरातून या 12 वर्षीय मुलीच अपहरण झालं आहे. मुलीच्या अपहरण प्रकरणात अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, पोलीस ठाण्यात अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली आहे. विशेष म्हणजे, वंचितचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येनं पोलीस ठाण्यात पोचले आहेत. पोलिसांनी तातडीने या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केलाय. अपहरणाच्या या प्रकारामुळे अकोला शहरात आणि कृषी नगरपरिसरात खळबळ उडाली आहे. मुलीच्या शोधात सिव्हिल लाईन पोलिसांचे दोन पथक तयार करण्यात आले आहेत. मुलीच्या शोधात पथक रवाना झाले आहेत. अद्यापपर्यंत पाच ते सहा संशयितांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
Location :
Akola,Maharashtra
First Published :
March 04, 2025 9:53 PM IST