Mumbai Vidhan Sabha Result 2024: किल्ला ठाकरेंचा पण झेंडा भाजपचा, मुंबईतील सगळ्या विजयी उमेदवारांची यादी

Last Updated:

Mumbai Vidhan Sabha Election Result 2024: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा दणदणीत विजय झाला आहे. 288 पैकी 231 जागांवर महायुती विजयी झाली आहे तर महाविकास आघाडीला फक्त 45 जागांवर विजय मिळाला आहे.

किल्ला ठाकरेंचा पण झेंडा भाजपचा, मुंबईतील सगळ्या विजयी उमेदवारांची यादी
किल्ला ठाकरेंचा पण झेंडा भाजपचा, मुंबईतील सगळ्या विजयी उमेदवारांची यादी
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा दणदणीत विजय झाला आहे. 288 पैकी 231 जागांवर महायुती विजयी झाली आहे तर महाविकास आघाडीला फक्त 45 जागांवर विजय मिळाला आहे. याशिवाय समाजवादी पक्षाला 2 आणि अपक्ष तसंच इतर छोट्या पक्षांना 10 जागांवर यश मिळालं आहे. या निवडणुकीमध्ये भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपने तब्बल 133 जागांवर विजय मिळवला आहे, तर शिवसेनेने 57 जागांवर आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 41 जागा जिंकल्या
महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने 20, काँग्रेसने 15 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 10 जागांवर विजय मिळवला आहे. उद्धव ठाकरेंचा गड मानला जाणाऱ्या मुंबईमध्येही भाजपने त्यांना धोबीपछाड दिली आहे. मुंबईतल्या 36 जागांपैकी 15 जागांवर भाजप, ठाकरेंची शिवसेना 10 जागांवर, शिवसेना 6 जागांवर, काँग्रेस 3 जागांवर, समाजवादी पार्टी 1 जागेवर आणि राष्ट्रवादी काँग्रेस एका जागेवर विजयी झाली. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबईमध्ये एकही जागा मिळाली नाही.
advertisement

मुंबईमधील विजयी उमेदवार

कुलाबा -राहूल नार्वेकर- भाजप
२.मलबार हिल-मंगलप्रभात लोढा - भाजप
३.भायखळा-मनोज जामसुतकर-ठाकरे गट
४.मुंबादेवी-अमिन पटेल - काँग्रेस
५.शिवडी -अजय चौधरी - ठाकरे गट
६.वरळी -आदित्य ठाकरे - ठाकरे गट
७.वडाळा-कालीदास कोळंबकर - भाजप
८.सायन कोळीवाडा -तमिळ सेल्वन- भाजप
advertisement
९.धारावी-ज्योती गायकवाड काँग्रेस
१०.माहीम - महेश सावंत- ठाकरे
११.बोरीवली-संजय उपाध्याय- भाजपा
१२.दहीसर-मनिषा चौधरी-भाजप
१३.मागाठाणे- प्रकाश सुर्वे- शिंदे गट
१४.कांदिवली-अतुल भातखळकर- भाजपा
१५.चारकोप-योगेश सागर- भाजपा
१६. मालाड-अस्लम शेख- काँग्रेस
१७. जोगेश्वरी पूर्व-अनंत नर-ठाकरे
१८.दिंडोशी-सुनील प्रभू- ठाकरे
१९.गोरेगांव-विद्या ठाकूर- भाजपा
२०. वर्सोवा-हारूण खान- ठाकरे गट
२१.अंधेरी पश्चिम-मुरजी पटेल-शिंदे गट
२२.अंधेरी पूर्व-अमित साटम-भाजप
advertisement
२३.मुलुंड-मिहिर कोटेचा भाजपा
२४.विक्रोळी-सुनील राऊत- ठाकरे
२५.भांडुप पश्चिम-अशोक पाटील-शिंदे गट
२६.घाटकोपर पश्चिम-राम कदम- भाजप
२७.घाटकोपर पूर्व-पराग शहा- भाजपा
२८.मानखुर्द शिवाजीनगर-अबू आझमी-सपा
२९.विलेपार्ले-पराग अळवणी-भाजपा
३०.चांदिवली-दिलीप लांडे- शिंदे गट
३१.कुर्ला-मंगेश कुडाळकर-शिंदे गट
३२.कलिना-संजय पोतनीस-ठाकरे
३३.वांद्रे पूर्व- वरूण सरदेसाई-ठाकरे
३४.वांद्रे पश्चिम-आशिष शेलार-भाजपा
३५.अनुशक्तीनगर-सना मलिक-राष्ट्रवादी अजित पवार
३६.चेंबुर-तुकाराम काते-शिंदे गट
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mumbai Vidhan Sabha Result 2024: किल्ला ठाकरेंचा पण झेंडा भाजपचा, मुंबईतील सगळ्या विजयी उमेदवारांची यादी
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement