Maharashtra Elections : उत्तर महाराष्ट्रात महायुतीचा स्कोअर 33-1, कोण आहेत काँग्रेसचे एकमेव आमदार शिरीष नाईक?

Last Updated:

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं पानिपत झालं आहे. महाविकास आघाडीला या निवडणुकीत सगळ्यात मोठा फटका उत्तर महाराष्ट्रात बसला आहे.

उत्तर महाराष्ट्रात महायुतीचा स्कोअर 33-1, कोण आहेत काँग्रेसचे एकमेव आमदार शिरीष नाईक?
उत्तर महाराष्ट्रात महायुतीचा स्कोअर 33-1, कोण आहेत काँग्रेसचे एकमेव आमदार शिरीष नाईक?
नाशिक : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं पानिपत झालं आहे. 288 जागांपैकी फक्त 49 जागांवर महाविकास आघाडीचा विजय झाला. यात ठाकरेंच्या शिवसेनेचा 20 जागांवर, काँग्रेसचा 16 जागांवर तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा 10 जागांवर विजय झाला. महाविकास आघाडीचे मित्रपक्ष असलेल्या समाजवादी पार्टीने 2 आणि कम्युनिस्ट पक्षाचा एक आमदार निवडून आला आहे.
महाविकास आघाडीला या निवडणुकीत सगळ्यात मोठा फटका उत्तर महाराष्ट्रात बसला आहे. उत्तर महाराष्ट्रातल्या 35 जागांपैकी फक्त एका जागेवर महाविकास आघाडीचा विजय झाला. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर मतदारसंघातून काँग्रेसचे शिरीष नाईक यांनी महाविकास आघाडीची लाज राखली. उत्तर महाराष्ट्राच्या नाशिक, जळगाव, धुळे या तीनही जिल्ह्यात महाविकास आघाडीला भोपळाही फोडता आला नाही. तर नंदुरबारमधून शिरीष नाईक यांच्या रुपात त्यांना एक जागा मिळाली.
advertisement
उत्तर महाराष्ट्रात महायुतीला फक्त दोनच जागा जिंकता आल्या नाहीत. यातल्या नवापूरच्या जागेवर महायुतीचा पराभव झाला, तर मालेगाव मध्य या मतदारसंघात महायुतीने उमेदवारच दिला नव्हता. मालेगाव मध्य मधून एमआयएमच्या मौलाना मुफ्ती यांचा विजय झाला आहे.
नवापूरमध्येही कांटे की टक्कर
नवापूरची जागा काँग्रेसने जिंकली असली तरी या मतदारसंघात कांटे की टक्कर बघायला मिळाली. मतमोजणीच्या शेवटच्या काही टप्प्यांमध्ये अपक्ष उमेदवार शरद गावित हे आघाडीवर होते. 23 व्या फेरीपर्यंत शरद गावित यांच्याकडे 197 मतांची आघाडी होती, पण 24 व्या फेरीमध्ये नाईक यांनी 525 मतांची आघाडी घेतली. यानंतर पोस्टल बॅलटची मतं मोजण्यात आल्यामुळे नाईक यांची आघाडी 1 हजार 100 मतांच्या पुढे गेली.
advertisement
नवापूर मतदारसंघात शरद गावित यांच्या नावासोबत साधर्म्य असणारे आणखी एक अपक्ष शरद गावित रिंगणात होते. या अपक्षाला 1 हजार 14 मतं मिळाली. शिरीष नाईक यांच्याविरोधात पराभूत झालेले शरद गावित हे भाजपच्या विजयकुमार गावित यांच धाकटे बंधू आहेत. याआधी 2009 साली नवापूर मतदारसंघातून ते अपक्ष म्हणून विजयी झाले होते. तेव्हापासून आतापर्यंत ते अपक्षच निवडणूक लढत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections : उत्तर महाराष्ट्रात महायुतीचा स्कोअर 33-1, कोण आहेत काँग्रेसचे एकमेव आमदार शिरीष नाईक?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement