...आणि विनोद तावडेंनी क्षितीज ठाकुरांकडे मागितले मासे, तणाव निवळला?

Last Updated:

विनोद तावडे पैशांच्या वाटपासाठी 15 कोटी रुपये घेऊन आले, असा आरोप क्षितीज ठाकूर यांनी केला आहे. क्षितीज ठाकूर यांनी पैशांचे बंडल देखील यावेळी दाखवले.

News18
News18
मुंबई :  विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी  (Maharashtra Assembly Election)  अवघे काही तास शिल्लक असताना विरारमध्ये मोठा राडा झाला. भारतीय जनता पक्षाचे (BJP)  नालासोपारा मतदारसंघाचे उमेदवार राजन नाईक आणि विनोद तावडे (Vinod Tawade) हे विरारच्या विवांत हॉटेलमध्ये भेटले. यावेळी बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे पुत्र क्षितीज ठाकूर हे विवांत हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांसह पोहोचले. हितेंद्र ठाकूर आणि क्षितीज ठाकूर यांना विवांत हॉटेलमध्ये घेरलं. यावेळी मोठा तमाशा झाला. विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर हितेंद्र ठाकूर आणि विनोद तावडे यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. मात्र निवडणूक आयोगाने ही पत्रकार परिषद थांबवली. दरम्यान पत्रकार परिषद घेण्यापूर्वी एवढ्या राड्यामध्ये तावडेंनी क्षितीज ठाकूरकडे वेगळीच मागणी केली.
विनोद तावडे पैशांच्या वाटपासाठी 15 कोटी रुपये घेऊन आले, असा आरोप क्षितीज ठाकूर यांनी केला आहे. क्षितीज ठाकूर यांनी पैशांचे बंडल देखील यावेळी दाखवले. तसेच विनोद तावडे यांच्याकडे डायरी आणि लॅपटॉपदेखील असल्याचा आरोप क्षितीज ठाकूर यांनी केला. जवळपास साडेतीन तास विवांत हॉटेलमध्ये मोठा गोंधळ झालेला बघायला मिळाला. त्यानंतर विनोद तावडे आणि ठाकूर पिता-पुत्र पत्रकार परिषदेसाठी तयार झाले. दरम्यान पत्रकार परिषदेपूर्वीचा एक संवाद समोर आला आहे. यामध्ये तावडेंनी मासे मागितले आहेत.
advertisement

पत्रकार परिषदेपूर्वी काय झाला संवाद?
विनोद तावडे: पत्रकार परिषदेत काय सांगायचे?
क्षितीज ठाकूर : मीडिया जे प्रश्न विचारतील त्याची उत्तरे द्यायची...
विनोद तावडे: पत्रकार परिषद संपल्यानंतर काय आपआपल्या कामाला लागायचे ना?
हिंतेद्र ठाकूर :तुम्हाला सोडायला मी मुंबईला येतो
विनोद तावडे: मासे नाही... काही नाही...
हिंतेद्र ठाकूर : करतो... करतो...
advertisement

ठाकूर आणि तावडे एकाच गाडीत रवाना

यानंतर हितेंद्र ठाकूर, क्षितीज ठाकूर आणि विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेतली. पण ही पत्रकार सुरु असतानाच निवडणूक आयोगाचे आदेश आले आणि ती पत्रकार परिषद तिथेच थांबवण्यात आली. हितेंद्र ठाकूर आणि क्षितीज ठाकूर हे दोन्ही नेते उमेदवार असल्याने त्यांना पत्रकार परिषद घेता येणार नाही, असं निवडणूक आयोगाने म्हटलं. त्यामुळे ती पत्रकार परिषद तिथेच थांबली आणि ठाकूर पिता-पुत्र हॉटेलमधून बाहेर पडले. या तावड्यानंतर ठाकूर आणि तावडे एकाच गाडीत रवाना झाले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
...आणि विनोद तावडेंनी क्षितीज ठाकुरांकडे मागितले मासे, तणाव निवळला?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement