"मॅटरमध्ये पडायचं नाही, हा दमच समज", वाल्मिक कराडचा फोटो बॅनर लावलेल्या घुगेची मुजोरी; ऑडिओ क्लिप व्हायरल
- Published by:Prachi Amale
Last Updated:
बप्पासाहेब घुगे कडून आता एका तरुणाला धमकावल्याची कॉल रेकॉर्डिंग समोर आली आहे.
बीड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड जिल्हा सरचिटणीस बप्पासाहेब घुगे चांगलेच चर्चेत आले आहे. आधी बॅनरवर वाल्मिक कराडचा फोटो लावल्याने तर आता त्यांची धमकी देतानाची एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे. मॅटरमध्ये पडायचं नाही या मॅटरमध्ये बप्पासाहेब घुगे आहे, दमच देतोय.. हा दम समजायचा, अशी धमकी तरुणाला देण्यात आल्याची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे.
बप्पासाहेब घुगे यांच्या वाढदिवसानिमित्त बीड शहरात लागलेल्या बॅनरवर संतोष देशमुख खून प्रकरणातला मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड याचे फोटो लावण्यात आले होते. त्यामुळे बप्पा घुगे चर्चेत आला होता. त्याच बप्पासाहेब घुगे कडून आता एका तरुणाला धमकावल्याची कॉल रेकॉर्डिंग समोर आली आहे. कॉल वरून धमकावलेल्या व्यक्तीचे नाव कैलास मुजमुले आहे. बीडचा सासुरा येथील संत एकनाथ महाराज मठ संस्थानचा वाद सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
काय आहे नेमकं ऑडिओ क्लिपमध्ये?
मी बप्पासाहेब घुगे बोलतोय तू जोला येथील देवस्थानातील रतन महाराजांना घेऊन का फिरतोस ? मी सांगितलं होतं या मॅटरमध्ये पडायचं नाही या मॅटरमध्ये बप्पासाहेब घुगे आहे. दमच देतोय.. हा दम समजायचा.. या मॅटरमध्ये बाबासाहेब घुगे पडतोय... तुला खेटायचं आहे का? तू ये बरडावर खेटायला. तुझी वाट बघतोय दोन मिनिटात बरडावर ये अशाप्रकारे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या बप्पासाहेब घुगे कडून धमकावलं जात असल्याचं या कॉल रेकॉर्डिंग मध्ये ऐकायला मिळत आहे.
advertisement
बीडच्या बॅनरची चर्चा
घुगे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या समर्थक कार्यकर्त्याकडून बीड शहरात बॅनर्स लावण्यात आले आहेत. यावर संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचे देखील फोटो लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या बॅनरवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आमदार धनंजय मुंडे, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे देखील फोटो आहेत. यामुळे आता या बॅनरची चर्चा होताना दिसत आहे..
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jun 17, 2025 5:32 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
"मॅटरमध्ये पडायचं नाही, हा दमच समज", वाल्मिक कराडचा फोटो बॅनर लावलेल्या घुगेची मुजोरी; ऑडिओ क्लिप व्हायरल









