वाल्मिकने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून रचला कट अन् तीन दिवसात तगडं प्लानिंग, महादेव गीतेच्या पत्नीचा गंभीर आरोप

Last Updated:

वाल्मिक कराड जेलरच्या ऑफिसमध्ये बसून मारहाणीचा कट रचत होता, याचे देखील सीसीटीव्ही तपासा, अशी मागणी महादेव गित्तेच्या पत्नीने केली आहे.

News18
News18
बीड:    वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला  बीड कारागृहात मारहाण झाल्याचे समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली. कारागृहात सकाळच्या सुमारास महादेव गिते आणि अक्षय आठवलेने राडा केल्याची माहिती समोर आली. त्यानंतर महादेव गित्तेसह चौघांना हर्सुल जेलला हलवलं. कराडच्या सांगण्यावरून आपल्यालाच मारहाण झाल्याचा गित्तेचा आरोप आहे. त्यानंतर महादेव गित्तेच्या पत्नीने देखील वाल्मिक कराडने जेलकरच्या केबीनमध्ये बसून कट रचल्याचा गंभीर आरोप महादेव गितेच्या पत्नी मीरा गीते यांनी केला आहे.
महादेव गितेची पत्नी म्हणाल्या, कारागहात आज जे घडलं ते चुकीचे झालं आणि सगळं खोटं आहे.माझं त्यांच्याशी (पतीशी) बोलण झालं. गुढीपाडव्याच्या अगोदरपासून हे कट रचत होते. सीसीटीव्ही जर तपासले तर कोणी कोणाले मारले हे समोर येईल. माझ्या पतीला मारहाण झाली ते सगळं सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. त्यांचे ऑपरेशन झाले आहे त्यात त्यांना मारहाण झाल्यानंतर रुग्णालयात देखील दाखल केले नाही. डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना रुग्णालयात हलवण्यात सांगितले मात्र पोलिसांनी त्यांना जेलमध्ये हलवले.
advertisement

पत्नीचे जेल प्रशासनावर गंभीर आरोप

गुढीपाडव्या आधी तीन दिवस यांचे प्लानिंग सुरू आहे. वाल्मिक कराड जेलरच्या ऑफिसमध्ये बसून मारहाणीचा कट रचत होता, याचे देखील सीसीटीव्ही तपासा. एवढच नाही तर 10 जणांनी मिळून माझ्या पतीला मारहाण केली आहे. आजपर्यंत कधीच एवढी तात्काळ पावलं उचलली नाही, आत्ताच कसे लगेलच मारहाण झाल्यानंतर दुसऱ्या कारागृहात हलवले. मारहाणीत अक्षय आठवलेचे असताना त्याला का हलवलं नाही यामागे नक्कीच काहीतरी मोठं षडयंत्र आहे. मी जिल्हाधिकाऱ्यांकडे सीसीटीव्हीची मागणी करणार आहे.
advertisement

नेमकं काय आहे प्रकरण?

बीडच्या जेलमध्ये वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण झाली. महादेव गित्ते आणि अक्षय आठवलेने मारहाण केल्याचं बोललं जातंय. खंडणी आणि संतोष देशमुख हत्यांकांड प्रकरणात कराड आणि घुले मकोका अंतर्गत शिक्षा भोगत आहेत.. आंधळे हत्याकांड प्रकरणात वाल्मिक कराडने खोट्या केसमध्ये अडकवल्याच्या रागातून महादेव गित्तेने कराडला मारहाण केल्याचं बोललं जात आहे. त्याचं घडलं असं की तुरुंगातील कैद्यांना कुटुंबिय किंवा आपल्या वकिलांना फोन करण्यासाठी विशिष्ठ व्यवस्था केली जाते. यावेळी दोन्ही गट आमनेसामने आले. दोघांमध्ये वाद झाल्यानंतर गित्ते आणि आठवलेने कराडला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी सुदर्शन घुले मध्ये पडल्यामुळे त्यालाही चोप दिला. अखेर तुरुंगातील पोलिसांनी मध्यस्ती करत वाद सोडवला. बीड तुरुंगात कराड आणि घुले एका बराकीत तर गित्ते आणि आठवलेला दुसऱ्या बराकीत ठेवण्यात आलं. मात्र गेल्या आठवड्याभरापासून दोन्ही गटात तणाव सुरू असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून मारहाण झाल्याचा आरोप महादेव गितेने केला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
वाल्मिकने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून रचला कट अन् तीन दिवसात तगडं प्लानिंग, महादेव गीतेच्या पत्नीचा गंभीर आरोप
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement