Walmik Karad : करोडोच्या जमिनी, हायप्रोफाईल शहरात कार्यालये..., वाल्मिक कराडचं साम्राज्य किती मोठं आहे?
- Published by:Prashant Gomane
 
Last Updated:
सुनावणीत वाल्मिक कराडवर 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याचसोबत कराडवर मोक्काही लावण्यात आला आहे. आता या प्रकरणात पुढे काय होते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तत्पुर्वी कराडचं साम्राज्य नेमकं कसं आहे? हे जाणून घेऊयात.
Walmik Karad Property : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात संशयित वाल्मिक कराडचे नाव समोर येते आहे. त्यात आज केज कोर्टात कराडच्या कोठवडीवर सुनावणी पार पडली.या सुनावणीत वाल्मिक कराडवर 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याचसोबत कराडवर मोक्काही लावण्यात आला आहे. आता या प्रकरणात पुढे काय होते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तत्पुर्वी कराडचं साम्राज्य नेमकं कसं आहे? हे जाणून घेऊयात.
एफसी रोडवर 115 कोटींची संपत्ती?
पुण्यात सर्वात हायप्रोफाईल समजल्या मगरपट्टा सिटी आणि एफसी रोड भागात वाल्मिक कराडची कोट्यवधी रुपयांची प्रॉपर्टी असल्याचे समोर आले आहे. जवळपास 115 कोटीची प्रॉपर्टी आज सुरेश धसांनी भर सभेत उघड केली आहे.
सुरेश धस म्हणाले,पुण्यातील जंगली महाराज रस्त्यामागे येणारा दुसरा रस्ता एफसी रस्ता आहे. एफसीरोडला प्रसिद्ध वैशाली हॉटेल आहे आणि वैशाली हॉटेलच्या पलीकडे सुनील सुशील पाटील बिल्डर आणि छाजेड त्याच्यामध्ये पार्टनर आहे. तिथे एफसी रोडवर आकांनी सात दुकानं बुक केली आहेत. पुण्यात बुक केलेल्या एका दुकानाची किंमत तब्बल 5 कोटी आहे. मी बिल्डकरकडून सर्व माहिती घेतली आहे. सात दुकानांपैकी चार दुकाने स्वत:च्या नावावर आणि तीन दुकाने ही दुसऱ्या पत्नीच्या नावावर आहेत. एवढच नाहीतर या दुकानाशेजारी आठवे दुकान हे विष्णू बहीण सोनावणे यांच्या नावावर आहे. मी स्वत: जाऊन त्यासंदर्भातील माहिती घेऊन आलो आहे.
advertisement
वाल्मिक कराडचा हडपसरमधील एक फ्लॅट 75 कोटीचा
मगरपट्ट्यामध्ये वाल्मिक कराडने ड्रायव्हरच्या नावावर संपूर्ण फ्लोअर बुक केला आहे. अॅमनोरा पार्क, मगरपट्टा सिटी इथे एका फ्लॅटची किंमत 15 कोटी रुपये आहे. 15 कोटीला एक फ्लॅट असताना तिथे वाल्मिक कराडच्या ड्रायव्हरच्या नावावर इमारतीचा एक अख्खा फ्लोअरच आहे. फ्लोअरची किंमत 75 कोटी आहे आणि हा संपू्र्ण फ्लोअरच आकांनी चालकाच्या नावावर केला आहे. एवढच नाही तर आकांनी फ्लोअर बुक करण्याअगोदर बिल्डरकडे संपूर्ण टेरेसच मागितला होता.मात्र बिल्डरने तो दिला नाही. आका अंबानीला मागे टाकतात की काय, आता अशीच शंका मला येऊ लागली.
advertisement
दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यात ऑफिस स्पेस
पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयासमोर वाल्मिक कराड यांनी दुसरी पत्नी ज्योती जाधव यांच्या नावावर प्रॉपर्टी खरेदी केली आहे. ज्योती जाधव यांच्या नावे सहाव्या मजल्यावर क्रमांक 610 सी ही 46.71 चौरस मीटर क्षेत्रफळाचं ऑफिस खरेदी केलं आहे. तसेच सहाव्या मजल्यावर 611 बी हे आणखी एक ऑफिसही ज्योती जाधव यांच्या नावे खरेदी केले आहे. या कोट्यावधी ऑफिस स्पेसची कागदपत्र न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहेत. दरम्यान वाल्मिक कराड याने कोट्यावधी रूपयांच्या बेनामी मालमत्ता घेतल्या असल्याचा आरोप होतोय त्यामुळे या प्रकारात इडी ने तातडीने चौकशी करावी अशी मागणी केली जातेय
advertisement
वाल्मिक कराडच्या जमिनी कुठे कुठे?
जमिनींविषयी माहिती देताना सुरेश धस म्हणाले, शिमरी पारगाव इथे 50 एकर जमीन आहे. बार्शीत 50 एकर जमीन, शिमरी पारगाव इथे 10 एकर जमीन, वॉचमनच्या नावावर 15 ते 20 एकर जमीन, जामखेड 10- 15 एकर जमीन येथे जमीन आहेत.
view commentsLocation :
Bid,Maharashtra
First Published :
January 14, 2025 3:06 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Walmik Karad : करोडोच्या जमिनी, हायप्रोफाईल शहरात कार्यालये..., वाल्मिक कराडचं साम्राज्य किती मोठं आहे?


