Wardha : वर्धा हादरलं, भर रस्त्यात नर्स तरुणीवर कटरने सपासप वार, हल्ला करून आरोपी थेट पोलीस स्टेशनमध्ये

Last Updated:

वर्ध्यामध्ये भर रस्त्यात नर्सवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली आहे.

वर्धा हादरलं, भर रस्त्यात नर्स तरुणीवर कटरने सपासप वार, हल्ला करून आरोपी थेट पोलीस स्टेशनमध्ये
वर्धा हादरलं, भर रस्त्यात नर्स तरुणीवर कटरने सपासप वार, हल्ला करून आरोपी थेट पोलीस स्टेशनमध्ये
नरेंद्र मते, प्रतिनिधी
वर्धा : वर्ध्यामध्ये भर रस्त्यात नर्सवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली आहे. हल्ल्यामध्ये रक्तबंबाळ झालेल्या तरुणीने कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात शिरत आश्रय घेतल्याने ती बचावली आहे. दरम्यान तरुणीवर हल्ला करणारा तरुण पोलिसांना शरण आला आहे.
वर्ध्याच्या मुख्य बाजारपेठ परिसरात असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ ओळखीच्या तरुणाने नर्सवर प्राणघातक हल्ला केला. तरुणाने नर्सच्या हातावर कटरने घाव करत गंभीर जखमी केले. हल्ला केल्यानंतर तरुणाने घटनास्थळावरून पळ काढला, पण जमाव पाठीमागे लागल्याने त्याने रस्त्यावरच असलेल्या रामनगर पोलीस ठाण्यात प्रवेश करत शरणागती पत्करली.
advertisement
जमावाचा पाठलाग सुरू असताना आरोपी रामनगर पोलीस ठाण्यात शरण गेल्यामुळे तो बचावला. ही घटना वर्धा शहराच्या मध्य भागात असलेल्या रस्त्यावर घडली आहे. 24 वर्षांची ही तरुणी नर्स म्हणून एका खाजगी रुग्णालयात काम करत होती. रुग्णालयाजवळ असलेल्या रस्त्यावर तिला तरुण भेटला.
तरुणीसोबत बोलत असताना अचानक काही वेळानंतर सौरभ रवींद्र क्षीरसागर या 29 वर्षीय तरुणाने त्याच्या हातातले कटर बाहेर काढले आणि तरुणीवर सपासप वार करत तिला गंभीर जखमी केलं. तरुणीवर हल्ला केल्यानंतर सौरभने तिथून पळ काढला. यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी त्याचा पाठलाग केल्यामुळे तो रामनगर पोलीस ठाण्यात बचावासाठी गेला आणि शरणागती पत्करली. सौरभ रवींद्र क्षीरसागर हा तरुण भुगावचा राहणारा आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Wardha : वर्धा हादरलं, भर रस्त्यात नर्स तरुणीवर कटरने सपासप वार, हल्ला करून आरोपी थेट पोलीस स्टेशनमध्ये
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement