महापौर बनवण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून MIM लाही ऑफर, पण.., जलील यांचा मोठा खुलासा

Last Updated:

21 नगरसेवक निवडून आले आहेत, तिथे महापौर करण्यासाठी, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून एक प्रस्ताव स्थानिक नेत्यांना आला होता

News18
News18
अविनाश कानडजे, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर:  महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे आता महापौर कोण होणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. अनेक ठिकाणी आघाडी आणि पाठिंबा घेऊन महापौर बनवण्याची हालचाल सुरू झाली आहे. अशातच मालेगाव महापालिकेमध्ये  महापौर करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून एक प्रस्ताव स्थानिक नेत्यांना आला होता, पण आम्ही नकार दिला, असं एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितलं.
advertisement
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत एमआयएमने ३३ जागा जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. पण, एमआयएम नगरसेवकांच्या जल्लोष पार्टीमध्ये पैसे उधळण्याचा प्रकार समोर आला. या घटनेनंतर इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेतली आणि झालेल्या घटनेवर खुलासा केला.
"पालिकेमध्ये आमचे ३३ नगरसेवक निवडून आले आहे, जल्लोषामध्ये कार्यक्रम होता, त्या ठिकाणी आमचे निवडून आलेले 33 नगरसेवक होते.  त्या ठिकाणी एका गायकाला बोलण्यात आलं होतं, तिथे काही उत्साही लोकांनी पैसे उधळले होते.  मला असं वाटत नाही की, त्याच्यामध्ये इम्तियाज जलील हा मोठा क्राईम केला आहे.  उत्साहात हा प्रकार घडला, पण हे विसरून देशात खूप सारे गंभीर प्रश्न आहेत.  त्याच्या बाबतीत विचार करण्याची आवश्यकता आहे, इम्तियाज जलील यांच्या कार्यक्रमात नोटांची उधळण गोरगरीब जे म्युझिशियन असतात ते पैसे जमा करून घेऊन जातात, असं जलील यांनी म्हटलं.
advertisement
'मालेगावमध्ये महापौरपदासाठी शिवसेनेकडून प्रस्ताव आला होता'
" मालेगाव सारख्या ठिकाणी आमचे 21 नगरसेवक निवडून आले आहेत, तिथे महापौर करण्यासाठी, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून एक प्रस्ताव स्थानिक नेत्यांना आला होता. आपण सोबत येऊ शकतो का? पण आमचे तिकडे जे स्थानिक आमदार आहेत, त्यांनी ठामपणे नकार देत पत्रकार परिषद घेऊन सांगितलं. भाजपसोबत जाणार नाही आणि एकनाथ शिंदे  यांच्या शिवसेनेसोबत जाणार नाही' असं जलील यांनी स्पष्ट केलं.
advertisement
' राज्यात तीन-चार महानगरपालिका असेल जिथे भाजपाला दूर ठेवण्यासाठी सर्व पक्ष एकत्र येऊन प्रयत्न सुरू आहे.  पार्टीचे अध्यक्ष ओवेसी यांनी स्पष्ट सांगितलंय सन्मानाने तुम्ही आमचा सपोर्ट मागत असाल तर नक्की त्याबाबत आम्ही पॉझिटिव्ह विचार करू' असंही जलील म्हणाले.
तलवार फिरवल्या प्रकरणी शिरसाट यांच्या मुलीवर गुन्हा का नाही? 
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये विजयी झाल्यानंतर शिंदे सेनेचे अभिजीत जीवनवाल या नगरसेवकाने मिरवणुकीत तलवार नाचवली होती. या नगरसेवकाने पराभूत झालेल्या विरोधी पक्षाच्या उमेदवाराच्या घरासमोरून रॅली काढत तलवार दाखवली होती. त्यावरून वेदांत नगर पोलीस ठाण्यामध्ये त्या नवनियुक्त नगरसेवकांवर गुन्हा दाखल झाला. दुसरीकडे त्याच प्रभागांमध्ये पालकमंत्री संजय शिरसाट यांची कन्या हर्षदा शिरसाट आणि त्यांचा पीए राजू राजपूत यांनीही विजयी मिरवणूक काढताना तलवार नाचवली होती. मात्र या दोघांवर गुन्हा दाखल केला नाही. आता यावरून माजी खासदार आणि एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी प्रश्न उपस्थित केलाय. कायदा आणि न्याय हा श्रीमंतासाठी वेगळा आणि गरिबासाठी वेगळा असतो का? असा प्रश्न उपस्थित करीत पोलिसांना याबद्दल विचारणार असल्याचं जलील यांनी सांगितलं.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
महापौर बनवण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून MIM लाही ऑफर, पण.., जलील यांचा मोठा खुलासा
Next Article
advertisement
Nagpur News: 'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने नवरा तुरुंगात, आता थेट नगरसेवक!
'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने तुरुंगात आता थेट नगरसेवक
  • यंदाच्या महापालिका निवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या असून काही आश्चर्यकारक निकाल ला

  • बुलडोझरच्या धक्क्याने या कुटुंबातील एका महिलेला थेट महापालिकेच्या सभागृहात पोहोच

  • अलिशा खान यांच्या रूपाने 'बुलडोझर पॉलिटिक्स'ला मतदारांनी चपराक दिल्याची चर्चा

View All
advertisement