Devendra Fadnavis : 'लोकसभेत आम्ही ओव्हर कॉन्पिडन्स, पण आता...', फडणवीसांचं मोठं विधान

Last Updated:

राज्यात लोकसभेनंतर चित्र बदललंय.विधानसभेत महायुती चांगली कामगिरी करेल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

'लोकसभेत आम्ही ओव्हर कॉन्पिडन्स, पण आता...', फडणवीसांचं मोठं विधान
'लोकसभेत आम्ही ओव्हर कॉन्पिडन्स, पण आता...', फडणवीसांचं मोठं विधान
मुंबई : राज्यात लोकसभेनंतर चित्र बदललंय.विधानसभेत महायुती चांगली कामगिरी करेल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. 'न्यूज18 इंडिया डायमंड स्टेट्स समिट महाराष्ट्र' या कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यात महायुतीचंच सरकार येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लोकसभेत उमेदवार जाहीर करायला उशीर झाल्याचंही त्यांनी कबूल केलं. अजित पवार सोबत आल्यानं संभ्रम होता त्यामुळे कार्यकर्त्यांना समजावण्यात वेळ गेल्याचं त्यांनी सांगितलं.
लोकसभेला कार्यकर्ते म्हणून आम्ही ओव्हर कॉन्पिडन्ट होतो. कारण देशात आम्ही निवडून येत आहोत, असा माहोल होता. महाराष्ट्रातही निवडून येऊ असा माहोल होता. ज्या क्षमतेने आम्हाला काम करायला पाहिजे होतं, तसं आम्ही केलं नाही. आज कार्यकर्त्यांनाही हे कळालं आहे की आपण आणखी क्षमतेने काम करायला पाहिजे होतं. कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
advertisement
अजितदादा आमच्यासोबत आले तेव्हा कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम तयार झाला होता. इतकी वर्ष यांच्यासोबतच लढलो, आता यांच्यासोबतच मत कसं मागायचं? या गोष्टीला कार्यकर्त्यांना समजायला त्यांच्यापर्यंत पोहोचायला वेळ लागला. आता कार्यकर्त्यांना या सगळ्या गोष्टी समजल्या आहेत, असं फडणवीस म्हणाले आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Devendra Fadnavis : 'लोकसभेत आम्ही ओव्हर कॉन्पिडन्स, पण आता...', फडणवीसांचं मोठं विधान
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement