advertisement

Manoj Jarange: बीडमधील गुंडांच्या टोळीचा नायनाट आता आम्ही करणार, मनोज जरांगेचा संतापले

Last Updated:

शिवराज दिवटे या तरुणाची आज मनोज जरांगे पाटील यांनी आंबेजोगाई येथील वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन भेट घेतली

News18
News18
बीड: गुंडांच्या टोळीचा नायनाट आम्हाला करावा लागेल. मी आता हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. सरकार या टोळीला संपवत नाही त्यामुळे आता आम्हाला संपवावे लागणार आहे, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी परळी आणि बीड जिल्ह्यातील गुंडागिरी संदर्भात मोठा वक्तव्य केला आहे. शिवराज दिवटे या तरुणाची आज मनोज जरांगे पाटील यांनी आंबेजोगाई येथील वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन भेट घेतली यावेळी ते बोलत होते.
आपण गुन्हा केला तरी आपलं काहीच होत नाही ही मानसिकता आरोपीमध्ये बळवल्याने पुन्हा गंभीर गुन्हे होत आहेत. सरकार आणि मुख्यमंत्र्यांनी या आरोपींना वाचवू नये. सर्वांवर मकोका लावा. अल्पवयीन आहेत असं म्हणून म्हणून कुठलाही आरोपी सुटता कामा नये. विशेष करून बीडच्या पालकमंत्र्यांनी हे होऊ देऊ नये, असेही मनोज जरांगे म्हणाले.

उंदरांचा सुळसुळाट थांबवला पाहिजे: मनोज जरांगे

advertisement
मनोज जरांगे म्हणाले, मी हे प्रकरण आता गांभीर्याने घेणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच पालकमंत्री म्हणून अजित दादा यांना दुसऱ्यांदा सांगतो मी हे प्रकरण गांभीर्याने घेणार आहे. गुंडांच्या टोळीचा नायनाट आम्हाला करावा लागेल. आता आपली लेकरांनाच मारले जात असेल तर या उंदरांचा सुळसुळाट थांबवला पाहिजे. बीड जिल्ह्यातील चार-पाच प्रतिष्ठित आणि समाजिक लोकांना घेऊन चर्चा करणार आहे. आता या टोळीचा नायनाट करावा लागणार आहे.
advertisement

टोळीचा मुळापासून बंदोबस्त केला पाहिजे : मनोज जरांगे

सरकार काय यांना संपवत नाही आता आम्हाला संपवावा लागणार आहे. आता मी मनावर घेतला आहे.
आता यांना सुट्टी देऊन चालणार नाही. या टोळीचा मुळापासून बंदोबस्त लोकं घेऊन आम्हालाच करावा लागणार आहे. आता बोलायचं कमी आणि करून दाखवायचे, असेही जरांगे म्हणाले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Manoj Jarange: बीडमधील गुंडांच्या टोळीचा नायनाट आता आम्ही करणार, मनोज जरांगेचा संतापले
Next Article
advertisement
महाराष्ट्राच्या राजकारणात Deputy Chief Minister इतके पावरफुल का? संविधानात अधिकार शून्य, पण पॉवर अफाट; उपमुख्यमंत्री का ठरतो किंगमेकर!
राज्यात उपमुख्यमंत्री इतके पावरफुल का? संविधानात अधिकार शून्य, पण पॉवर अफाट
  • उपमुख्यमंत्री पण मुख्यमंत्र्यांचा तोडीस तोड

  • 'डेप्युटी सीएम' पदाची खरी ताकद नेमकी कशात

  • 'उपमुख्यमंत्री' पदाबद्दल काय सांगतं भारताचं संविधान

View All
advertisement