३ वर्षापासून सावलीसारखा सोबत, सांगलीत शिव मल्हार क्रांती सेना, मारहाण करणारा पडळकरांचा तो गावगुंड कार्यकर्ता कोण?

Last Updated:

Who Is Hrishikesh Takale: आमदार गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता असलेला ऋषिकेश टकले याने राष्ट्रवादीचे पदाधिकारी, आव्हाड यांचे कट्टर कार्यकर्ते नितीन देशमुख यांना विधिमंडळाच्या दारात मारहाण केली.

पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले
पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले
आसिफ मुरसल, मुंबई : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना, राज्यातील जनतेच्या प्रश्नांवर चर्चा अपेक्षित असताना विरोधी पक्ष आणि सत्ताधारी आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली ते ही लोकशाहीचे मंदिर असलेल्या विधान भवनाच्या दारात... आताच्या काळात आमदार मंत्र्यांसोबत गुंड मवाली फिरतात इथपर्यंत राजकीय अध:पतन झाले आहे हे आता पूर्ण महाराष्ट्र जाणतो. परंतु विधान भवनात जिथे कायदे बनतात, तिथेच जर गुंड मवाल्यांना प्रवेश मिळायला लागला आणि रस्त्यावर जशी गुंडगिरी होते तशी मारहाण जर विधिमंडळाच्या द्वारात व्हायला लागली तर कसला कायदा आणि कसली सुव्यवस्था? असा प्रश्न सर्वसामान्य विचारत आहेत. 'अमृतकाळात' मुद्द्यांची लढाई आता गुद्द्यांवर येऊन पोहोचली आहे. ज्या विधिमंडळात अनेक थोर दिग्गजांची भाषणे झाली, त्यांच्या भाषणांनी सभागृहाची उंची वाढली, त्या सभागृहाच्या दारात आता एकमेकांना शिव्यांची लाखोली वाहिली जाते, हे दुर्दैव...
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातला वाद थेट हाणामारीपर्यंत पोहोचला आहे. दोघा नेत्यांमध्ये काल शिवीगाळीची घटना घडल्यानंतर आज एकमेकांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधान भवनाच्या लॉबीमध्ये जोरदार राडा झाला. जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक नितीन देशमुख यांना गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. अधिवेशन सुरू असताना आणि विधान भवनाला कडेकोट सुरक्षा व्यवस्था असताना विधान भवनाच्या द्वाराजवळच हा सगळा प्रकार घडल्याने आमदार आणि मंत्र्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित होत आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घडलेल्या प्रकाराची गंभीर दखल घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
advertisement

गोपीचंद पडळकर यांच्यासोबत असलेला तो गावगुंड कार्यकर्ता कोण?

आमदार गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता असलेला ऋषिकेश टकले याने राष्ट्रवादीचे पदाधिकारी, आव्हाड यांचे कट्टर कार्यकर्ते नितीन देशमुख यांना विधिमंडळाच्या दारात मारहाण केली. पोलिसांनी मध्यस्थी करूनही टकले हा वारंवार देशमुखांच्या अंगावर धावून गेला. अगदी रस्त्यावर गुंडगिरी होते, तशी गुंडगिरी त्याने विधिमंडळाच्या लॉबीत करण्याचा प्रयत्न केला. गेल्या तीन चार वर्षांपासून ऋषिकेश टकले हा गोपीचंद पडळकर यांच्यासोबत सावलीसारखा सोबत असतो. मतदारसंघात फिरताना, विविधे उद्घाटने आणि सभा संमेलनात तसेचत अधिवेशन काळात टकले हा गोपीचंद पडळकर यांच्यासोबत असतो.
advertisement
ऋषिकेश टकले याची स्वतःची हिंदुस्थान शिव मल्हार क्रांती सेना आहे. त्याच्या संघटनेचा तो सांगली जिल्हा अध्यक्ष आहे. पाचवा मैल पलूस तालुका या ठिकाणी ऋषिकेश टकले राहतो. महिलेचा विनयभंग, मारामारी करणे, गंभीर इजा होईल अशी दुखापत करणे, शासकीय कामात अडथळा आणणे असे गंभीर गुन्हे त्याच्या नावावर दाखल आहेत. भारतीय दंड विधान कलम ३२४, कलम ३२३, कलम ५०४, कलम ५०६, कलम १४३, कलम १४७, कलम १४८, कलम ३५४ (ब), कलम ३२३, कलम ५०४, कलम ११४, कलम ३३२, कलम १४८, कलम ३५३, कलम ३५२, कलम ५०४, कलम ५०६, कलम ३६५, कलम ३०७, अशा कलमान्वये त्याच्यावर गु्न्हे दाखल आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
३ वर्षापासून सावलीसारखा सोबत, सांगलीत शिव मल्हार क्रांती सेना, मारहाण करणारा पडळकरांचा तो गावगुंड कार्यकर्ता कोण?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement