Who is Birsa Munda : राहुल गांधींनी ज्यांचा फोटो हाती घेतला, ते बिरसा मुंडा होते तरी कोण?

Last Updated:

Who is Rahul Gandhi : आपल्या भाषणाच्या सुरुवातीला राहुल गांधी यांनी संविधानाची प्रत दाखवली. त्यानंतर त्यांनी बिरसा मुंडा यांचा फोटो हाती घेतला आणि भाजपवर निशाणा साधला. बिरसा मुंडा होते तरी कोण?


राहुल गांधींनी ज्यांचा फोटो हाती घेतला, ते बिरसा मुंडा होते तरी कोण?
राहुल गांधींनी ज्यांचा फोटो हाती घेतला, ते बिरसा मुंडा होते तरी कोण?
मुंबई :  महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज नंदुरबार येथील प्रचार सभेला संबोधित केले. नंदुरबार हा आदिवासीबहुल भाग आहे. आपल्या भाषणात राहुल गांधी यांनी आदिवासींच्या प्रश्नावर भाषण केले. आपल्या भाषणाच्या सुरुवातीला राहुल गांधी यांनी संविधानाची प्रत दाखवली. त्यानंतर त्यांनी बिरसा मुंडा यांचा फोटो हाती घेतला आणि भाजपवर निशाणा साधला. बिरसा मुंडा होते तरी कोण? आदिवासींमध्ये बिरसा मुंडा हे आजही जननायक, स्वातंत्र्यसेनानी म्हणून ओळखले जातात.

बिरसा मुंडा आहे तरी कोण?

बिरसा मुंडा हे भारतीय आदिवासी स्वातंत्र्य सेनानी आणि आदिवासींचे नेते होते. ब्रिटिश राजवटीत 19व्या शतकाच्या उत्तरार्धात बंगाल प्रेसिडेन्सी (आता झारखंड) येथे झालेल्या आदिवासी धार्मिक सहस्त्राब्दी चळवळीचे त्यांनी नेतृत्व केले, ज्यामुळे ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले. भारतातील आदिवासी त्यांना देवासमान मानतात आणि 'धरती आबा' म्हणूनही ओळखले जातात.
advertisement
1858-94 च्या सरदारी चळवळीने बिरसा मुंडा उठावाचा आधार बनवला, जो भूमिज-मुंडा सरदारांच्या नेतृत्वाखाली लढला गेला. 1894 मधील सरदारी लढाई मजबूत नेतृत्वाअभावी यशस्वी झाली नाही, त्यानंतर आदिवासी बिरसा मुंडा यांच्या बंडात सामील झाले.
1 ऑक्टोबर, 1894 रोजी बिरसा मुंडा यांनी सर्व मुंडांना एकत्र केले आणि ब्रिटिशांकडून कर माफीसाठी एक चळवळ आयोजित केली. या चळवळीला 'मुंडा बंड' किंवा 'उलगुलन' असेही म्हटले जाते. बिरसा मुंडा यांना 1895 मध्ये अटक करण्यात आली. हजारीबाग मध्यवर्ती कारागृहात त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती. 1897 ते 1900 या काळात मुंडा आणि ब्रिटिश सैनिक यांच्यात युद्धे झाली आणि बिरसा आणि त्यांच्या समर्थकांनी इंग्रजांच्या नाकीनऊ आणले होते.
advertisement

इंग्रजांसोबत दोन हात...

ऑगस्ट 1897 मध्ये, बिरसा आणि त्याच्या चारशे सैनिकांनी, बाण आणि धनुष्यांसह, खुंटी पोलिस स्टेशनवर हल्ला केला. 1898 मध्ये, तांगा नदीच्या काठावर मुंडांची ब्रिटीश सैन्याशी चकमक झाली, ज्यामध्ये ब्रिटिश सैन्याचा प्रथम पराभव झाला परंतु नंतर त्या भागातील अनेक आदिवासी नेत्यांना अटक करण्यात आली.

बिरसा यांना अटक, संशयास्पद मृत्यू...

advertisement
जानेवारी 1900 मध्ये डोंबारी टेकडीवर आणखी एक संघर्ष झाला ज्यामध्ये अनेक आदिवासी महिला आणि मुले मारली गेली. त्या ठिकाणी बिरसा आपल्या जाहीर सभेला संबोधित करत होते. बिरसांच्या काही शिष्यांना अटकही झाली. शेवटी, स्वतः बिरसा यांनाही चक्रधरपूरच्या जामकोपई जंगलातून 3 फेब्रुवारी 1900 रोजी इंग्रजांनी अटक केली. ब्रिटिशांच्या कैदेत असताना 9 जून 1900 रोजी त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Who is Birsa Munda : राहुल गांधींनी ज्यांचा फोटो हाती घेतला, ते बिरसा मुंडा होते तरी कोण?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement