रेशन कार्डवर नाव आहे की नाही? आधार कार्ड नंबरवरुन घरबसल्या चेक करा
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
तुम्हाला 10 वेळ रेशनकार्ड केंद्रावर चौकशी करायला जाण्याची गरज नाही. भारत सरकारची डिजिटल इंडिया मोहिम सध्या वेगाने पुढे सरकत आहे.
मुंबई: रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. तुमचं रेशन कार्डची केवायसी झाली नसेल तर आता घरबसल्या चेक करता येणार आहे. त्यासाठी तुम्हाला 10 वेळ रेशनकार्ड केंद्रावर चौकशी करायला जाण्याची गरज नाही. भारत सरकारची डिजिटल इंडिया मोहिम सध्या वेगाने पुढे सरकत आहे.
यामुळे आता अनेक शासकीय सेवा घरबसल्या, मोबाइल किंवा लॅपटॉपवरून ऑनलाइन मिळू लागल्या आहेत. नागरिकांनी सरकारी कार्यालयांचे चकरा न लावता आवश्यक सेवा घेण्यासाठी हे तंत्रज्ञान वापरणे सुलभ झाले आहे. अशाच उपयुक्त सेवांपैकी एक म्हणजे, आधार कार्डाच्या मदतीने तुमचं नाव राशन कार्ड यादीत आहे का हे तपासण्याची सुविधा.
घरबसल्या चेक करा नाव
राशन कार्ड यादीत नाव तपासण्यासाठी ही सेवा जवळपास सर्व राज्यांमध्ये उपलब्ध आहे. यासाठी आधार कार्ड जवळ ठेवा. त्यासोबत स्मार्टफोन किंवा लॅपटॉप आणि इंटरनेट ब्राऊजर (जसे की Google Chrome किंवा Microsoft Edge) लागेल. खाली दिलेल्या पायऱ्या लक्षपूर्वक फॉलो करा.
advertisement
नाव कसं पाहायचं?
सर्वप्रथम राष्ट्रीय अन्न सुरक्षा पोर्टलच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या: https://nfsa.gov.in/Default.aspx
वेबसाइटवर "State Food Portals" या पर्यायावर क्लिक करा.
त्यानंतर आपल्या राज्याच्या नावावर क्लिक करा.
उघडलेल्या पानावर आधार क्रमांक किंवा राशन कार्ड क्रमांक यापैकी एक टाकण्याचा पर्याय येईल. इथे "आधार क्रमांक" निवडा.
त्यानंतर आपला आधार क्रमांक भरून ‘विवरण पहा’ (Submit/Check Details) या पर्यायावर क्लिक करा.
advertisement
त्यानंतर संबंधित राशन कार्डातील माहिती स्क्रीनवर दिसेल. यामध्ये घरप्रमुखाचे नाव, कार्ड क्रमांक, पत्ता आणि घरातील सदस्यांची माहिती असेल.
वेळ आणि नेटवर्कचा विचार ठेवा
काही वेळा सरकारी वेबसाइट्स धीम्या गतीने चालतात. त्यामुळे दैनंदिन गर्दीच्या वेळेत अडचण येऊ शकते. अशा वेळी रात्रीच्या वेळेस ही सेवा वापरणे अधिक सोयीचे ठरते कारण त्या वेळी सर्व्हरवरील लोड कमी असतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 10, 2025 11:28 AM IST