दीड टन वजन अन् 30 हजार रेडकांचा बाप, तब्बल 10 कोटींचा रेडा पाहिलात का? Video

Last Updated:

Golu 2 मुळचा हरियाणातील असणारा गोलू 2 हा रेडा आजवर कित्येक सौंदर्य स्पर्धांचा विजेता आहे.

+
30

30 हजार रेडकांचा बाप अन् दीड टन वजन, तब्बल 10 कोटींचा रेडा पाहिलात का? Video

साईप्रसाद महेंद्रकर / प्रतिनिधी
कोल्हापूर : गायी, म्हशी अशा आपल्या पाळीव पशुंवर त्यांच्या मालकांचे जीवापाड प्रेम असते. त्यांची स्वतःपेक्षा जास्त काळजी घेतली जाते. अशाच प्रकारे एका गोलू 2 नावाच्या रेड्याची अगदी स्पेशल पद्धतीने काळजी घेतली जाते. कारण हा रेडा देखील स्पेशल आहे. मुळचा हरियाणातील असणारा गोलू 2 हा रेडा आजवर कित्येक सौंदर्य स्पर्धांचा विजेता आहे. विशेष म्हणजे 30 हजार रेडकांचा बाप असणाऱ्या गोलू 2 ची किंमत 10 कोटी रुपये सांगितली जाते.
advertisement
10 कोटींचा रेडा कोल्हापुरात
गोलू 2 नावाच्या या रेड्याचे दर्शन कोल्हापुरातील पशुप्रेमींना एका कृषी प्रदर्शनात घेता येत आहे. हरियाणा येथील पानिपत येथील हा रेडा असून त्याचे मालक नरेंद्र सिंह यांनी त्याला कोल्हापुरात आणले. पद्मश्री पुरस्कार विजेते असलेल्या नरेंद्र सिंह यांच्या या गोलू 2 रेड्याची किंमत तब्बल 10 कोटी रुपये आहे. सहा वर्षांचा रेडा गोलू-2 हा त्यांच्या कुटुंबातील तिसरी पिढी आहे. या रेड्याच्या विशेष शरीरयष्टीमुळे सर्वत्र प्रसिद्ध असणाऱ्या आजोबांचे नाव गोलू ठेवण्यात आले होते. तर आता हा गोलू 2 हा देशभर आपले नाव गाजवत आहे. गोलू-2 चे वीर्य विकून तो दरवर्षी सुमारे 25 लाख रुपये कमावतो, असे गोलू 2 चे मालक नरेंद्र सिंह यांनी सांगितले.
advertisement
काय असतो गोलू 2 चा खुराक?
10 कोटी रुपयांच्या या रेड्याच्या आहारात सुक्या मेव्याचा समावेश असतो. त्याचे वजन सुमारे दीड टन आहे. त्याची लांबी 14 फूट तर उंची सुमारे 6 फूट आहे. गोलू 2 ला दररोज सुमारे 35 किलो कोरडा आणि हिरवा चारा आणि हरभरा लागतो. त्याच्या आहारात 7 ते 8 किलो गुळाचाही समावेश असतो. त्याला अधूनमधून दूध, तूपही दिले जाते. एकूणच त्याच्या खुराकावर महिन्याला सुमारे 30 ते 35 हजार रुपये खर्च येतो, असे मालक नरेंद्र सिंह यांनी सांगितले आहे.
advertisement
30 हजार म्हशी आणि रेड्यांचा बाप
गोलू 2 या मुऱ्हा जातीच्या रेड्याच्या शुक्राणूंची विक्री मालक नरेंद्र सिंह करतात. गोलू 2 च्या शुक्राणूंना फक्त देशातच नाही, तर परदेशातही मोठी मागणी आहे. नरेंद्र सिंह फक्त शेतकरी आणि पशुपालकांना शुक्राणू पुरवतात. त्यामुळेच गोलू 2 हा आजवर 30 हजार म्हशी आणि रेड्यांचा बाप आहे.
advertisement
2019 साली नरेंद्र सिंह यांना पद्मश्री पुरस्कार
गोलू 2 रेड्याचे मालक नरेंद्र सिंह हे हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यातील दिदवारी गावचे रहिवासी आहेत. त्यांना पशुपालन क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. 2019 मध्ये त्यांना हा पद्मश्री पुरस्कार बहाल करण्यात आला होता. आजही ते इतर शेतकऱ्यांना पशुपालना संदर्भात प्रोत्साहन आणि मार्गदर्शन देत असतात.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
दीड टन वजन अन् 30 हजार रेडकांचा बाप, तब्बल 10 कोटींचा रेडा पाहिलात का? Video
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement