एका निर्णयानं बदललं दहावी नापास तरुणाचं आयुष्य, आज वर्षाला करतोय लाखो रुपये कमाई
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
संदीप कुमार हा तरुण बालपणी अभ्यासात कच्चा होता. हायस्कूलमध्ये तो नापास झाला. मात्र, तो खचला नाही. जाणून घेऊयात, संदीपच्या संघर्षाची यशस्वी कहाणी.
सौरभ वर्मा, प्रतिनिधी
रायबरेली : “संघर्ष हेच यशाचं रहस्य आहे”, असं मत एका तरुणानं व्यक्त केलं आहे. या तरुणाने आपल्या मेहनतीच्या बळावर जे केलं, ते पाहून आज संपूर्ण समाजातील तरुणाईसाठी तो एक मोठा आदर्श बला आहे. कमी वयात हा तरुण आपल्या मेहनतीच्या बळावर लखपती बनला आहे. संदीप कुमार असे या तरुणाचे नाव आहे. आज जाणून घेऊयात, संदीपच्या संघर्षाची यशस्वी कहाणी.
advertisement
संदीप कुमार हा तरुण उत्तर प्रदेशातील रायबरेलीच्या शिवगढ येथील रहिवासी आहे. तो बालपणी अभ्यासात कच्चा होता. हायस्कूलमध्ये तो नापास झाला. मात्र, तो खचला नाही. त्याचे मन अभ्यासात न रमल्याने तो कामाच्या शोधात इंदूरला गेला. तिथे त्याने एका टेंट हाऊसमध्ये मजूर म्हणून काम केले. मात्र, त्याठिकाणीही त्याचे मन लागले नाही. मग यानंतर तो परत गावी आला. याठिकाणी त्याची भेट कुलदीप कुमार नावाच्या व्यक्तीशी झाली.
advertisement
ही आहे भारतातील सर्वात महागडी टॉफी, फक्त 3 महिने उपलब्ध, किंमत ऐकून तुम्हीही व्हाल चकित
संदीप कुमारने कुलदीप यांच्याकडून वराह पालनाची माहिती घेतली. त्यांनी सांगितले की, सुरुवातीला यामध्ये खर्च येतो. मात्र, नंतर चांगला नफा मिळतो. त्याची माहिती मिळताच त्याने गावाबाहेर असलेल्या आपल्या खाली जमिनीवर वराह पालन सुरू केले. आता त्याला चांगला नफा मिळत आहे. तो मागील 5 वर्षांपासून हा व्यवसाय करत आहे. कमी खर्चात जास्त नफा मिळत असल्याचे संदीपने सांगितले. याठिकाणी वराहच्या आरोग्याचीही काळजी घेतली जाते.
advertisement
लोकांनी मारले टोमणे, पण पतीनं दिला पाठिंबा, महिलेनं करुन दाखवलं, ट्रॅक्टरचं स्टेअरिंग घेतलं हातात अन्...
6 महिन्यात एक वराह तयार होतो. त्याला अडीच ते तीन लाख रुपयात विकले जाते. म्हणजे अशाप्रकारे वर्षाला 6 ते 7 लाख रुपये कमी खर्चात संदीप कमावत आहेत. संघर्ष हेच यशाचं रहस्य आहे, असे तो म्हणतो.
Location :
Uttar Pradesh
First Published :
June 12, 2024 12:37 PM IST
मराठी बातम्या/मनी/कृषी/
एका निर्णयानं बदललं दहावी नापास तरुणाचं आयुष्य, आज वर्षाला करतोय लाखो रुपये कमाई