Business Idea: कमी भांडवलात फायद्याचा बिझनेस! फक्त सफेद शर्टचा ब्रँड, 500 रुयपांत खरेदी अन् लाखात कमाई!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Business Idea: मुंबईतील एका तरुणानं फक्त सफेद शर्ट्सचा फेमस ब्रँड तयार केला आहे. इथं 500 रुपयांत शर्ट्स खरेदी करून तुम्ही लाखोंची कमाई करू शकता.
मुंबई: व्यवसायात काहीतरी वेगळं करून दाखवायचं असेल, तर कल्पकतेसोबत गरज ओळखणंही तितकंच महत्त्वाचं असतं. हेच सिद्ध केलं आहे मुंबईतील अविनाश भागवत यांनी. अनेक वर्षे नोकरी करूनही समाधान न मिळाल्याने त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, व्यवसायासाठी काहीतरी हटके करायचं, असं त्यांनी ठरवलं आणि त्यातून जन्म झाला ‘नेता’ या सफेद शर्ट आणि पँट ब्रँडचा.
महाराष्ट्रात कोणीही विशिष्टपणे फक्त सफेद शर्ट विकणारा ब्रँड नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी ही संधी ओळखली. आज ‘नेता’ ब्रँड अंतर्गत खादी व लीननचे दर्जेदार सफेद शर्ट्स आणि पँट्स उपलब्ध आहेत. हे शर्ट वारकरी संप्रदाय, कॉर्पोरेट कर्मचारी, तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील पुढाऱ्यांसाठी विशेषतः डिझाईन केलेले आहेत.
advertisement
फक्त 500 रुपयांपासून प्युअर कॉटन शर्ट
नेता कॉटनमधील शर्टची होलसेल दरात किंमत ही खूप वाजवी आहे. यांच्याकडे तुम्हाला फक्त 500 रुपयांपासून प्युअर कॉटन शर्ट मिळतील. तसंच लीनन शर्ट देखील 450 ते 750 रुपयांपर्यंत होलसेल दरात मिळतील. एकावेळी तुम्हाला किमान 150 शर्ट पीस घ्यावे लागतील. तसंच कॉटन रेडिमेंट पॅन्ट देखील फक्त 450 रुपयांपासून होलसेल दरात मिळतात. यामध्ये तुम्हाला वेगवगेळ्या साईजच्या पॅन्ट शिवून दिल्या जातात.
advertisement
गेली तीन वर्षे अविनाश स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करून हा व्यवसाय यशस्वीरित्या चालवत आहेत. त्यांची उत्पादने होलसेल आणि रिटेल दोन्ही दरात विकली जातात. विशेष म्हणजे, इच्छुक उद्योजकांसाठी ‘नेता’ ब्रँडची फ्रेंचायझी सुरू करण्याची संधीही उपलब्ध आहे. अविनाश स्वतः फ्रेंचायझी सुरू करण्यात संपूर्ण मार्गदर्शन करतात. व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे.
advertisement
लोकेशन काय?
‘नेता’चे शर्ट आता अंधेरी येथील मोगरा मेट्रो स्टेशनपासून केवळ 10 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या श्रीनाथ इंडस्ट्री येथे होलसेल दरात सहज उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, फ्री डिलिव्हरी आणि कॅश ऑन डिलिव्हरी सारख्या सुविधा देखील देण्यात येतात. महाराष्ट्रातील कोपऱ्यांतून व्यवसायाची संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी हा बिझनेस एक नवीन दिशा दाखवणारा ठरत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 20, 2025 12:36 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Business Idea: कमी भांडवलात फायद्याचा बिझनेस! फक्त सफेद शर्टचा ब्रँड, 500 रुयपांत खरेदी अन् लाखात कमाई!