Mumbai Market: फायद्याची ऑफर, शालेय पुस्तके फक्त अर्ध्या किमतीत, मुंबईतील या दुकानाला द्या भेट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
Mumbai Market: राज्यात शाळा सुरू झाल्या असून पालक आणि विद्यार्थ्यांची शालेय साहित्य खरेदीची लगबग सुरू आहे. मुंबईतील एका दुकानात फक्त अर्ध्या किमतीत पहिली ते ग्रॅज्युएशनपर्यंतची सर्व पुस्तके मिळतात.
मुंबई: यंदा शैक्षणिक वर्ष सुरू झालं असून शालेय साहित्याच्या खरेदीची लगबग सुरू आहे. मुंबईत होलसेल दरात पुस्तके मिळत आहेत. दादर येथील 'देउबाई लेन' गल्लीत वसलेली गॅलेक्सी बुक स्टोर शालेय विद्यार्थ्यांसाठी खास ऑफर आहे. या दुकानात शालेय पुस्तकं पाऊण आणि अर्ध्या किंमतीत उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांसाठी ही ऑफर खूपच फायदेशीर ठरणारी असून ही पुस्तकं 50 रुपयांपासून मिळतात. लोकल18 च्या माध्यमातून याचबाबत जाणून घेऊ.
मुंबईतील ‘गॅलेक्सी बुक स्टोअर’ येथे शालेय पुस्तकं अर्ध्या किमतीत विकली जातात. या ठिकाणी विद्यार्थ्यांना जुनी पुस्तके एक्सचेंज करून नवीन किंवा सेकंड हँड पुस्तके घेण्याची सुवर्णसंधी देखील आहे. यामुळे विद्यार्थ्यांना महागडी पुस्तकं कमी किमतीत मिळवता येतात.
advertisement
सर्व प्रकारच्या पुस्तकांचा संग्रह
सर्व प्रकारच्या पुस्तकांचा संग्रह जसे की शालेय, कॉलेज, टेक्निकल, मेडिकल, मॅनेजमेंट, इतिहास, भूगोल, फिक्शन, नॉनफिक्शन, डिक्शनरी, कथा कादंबरी, आध्यात्मिक, धार्मिक अशा सर्व प्रकारची पुस्तकं येथे उपलब्ध आहेत. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी देखील उपयुक्त पुस्तकं इथे उपलब्ध आहेत. MBBS अभ्यासक्रमाची पुस्तके आणि लॉ च्या पुस्तकांचा समावेश देखील येथे आहे.
advertisement
विद्यार्थ्यांसाठी विशेष ऑफर
सध्या या बुक स्टोअर्समध्ये विद्यार्थ्यांसाठी खास ऑफर असून 40 टक्के रिटर्न मिळवता येतो. वह्यांवर देखील 20 टक्के डिस्काउंट देखील उपलब्ध आहे. सर्व पुस्तकं चांगल्या कंडिशनमध्ये असून डायजेस्ट, पेपर सोल्यूशन्स, रिअलेबल आणि मास्टर की देखील उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पहिली ते ग्रॅज्युएशन पर्यंत सगळ्या पुस्तकांचा पुरेसा संग्रह मिळणार आहे. या संधीचा लाभ घेतल्यास, विद्यार्थ्यांना आवश्यक सर्व प्रकारच्या पुस्तकांची खरेदी चांगल्या किमतीत करता येईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 20, 2025 9:16 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Mumbai Market: फायद्याची ऑफर, शालेय पुस्तके फक्त अर्ध्या किमतीत, मुंबईतील या दुकानाला द्या भेट