शेअर मार्केटवाल्यांनो, 4 जूनच्या आधी घ्या हे 'मोदी स्टॉक्स', परदेशातील लोकांनी 54 शेअर्सवर लावला डाव!
- Published by:sachin Salve
- trending desk
Last Updated:
शेअर बाजारात पैसे गुंतवणाऱ्या प्रत्येक गुंतवणूकदाराच्या मनात सध्या एक प्रश्न आहे. 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मार्केटची प्रतिक्रिया काय असेल?
मुंबई : शेअर बाजारात पैसे गुंतवणाऱ्या प्रत्येक गुंतवणूकदाराच्या मनात सध्या एक प्रश्न आहे. 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मार्केटची प्रतिक्रिया काय असेल? असा हा प्रश्न आहे. चांगल्या परताव्यासाठी कोणत्या शेअर्सवर पैसे लावावेत? असाही प्रश्न काहींच्या मनात आहे. आंतरराष्ट्रीय ब्रोकरेज हाऊस सीएलएसएने 54 कंपन्यांचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. विशेष म्हणजे यातील बहुतांश शेअर्स हे सरकारी कंपन्यांचे आहेत. मोदी सरकारने आपला दुसरा कार्यकाळ संपण्यापूर्वी राबवलेल्या धोरणांमुळे या कंपन्यांना मोठा फायदा होईल, असा विश्वास ब्रोकरेज फर्मला आहे.
यातील बहुतांश कंपन्या कॅपेक्स आणि पायाभूत सुविधा क्षेत्राशी संबंधित आहेत. यामध्ये सरकारी आणि खासगी दोन्ही कंपन्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे सीएलएसएने या निवडक शेअर्सना 'मोदी स्टॉक्स' असं नाव दिलं आहे.
'या' शेअर्सवर लावावेत पैसे
ब्रोकरेज फर्म सीएलएसएने सांगितलं की, निवडणुकीपूर्वी गेल्या सहा महिन्यांत शेअर मार्केटमध्ये प्रचंड वाढ दिसली आहे. मार्केटच्या या तेजीत मोदी स्टॉक्समधील 90 टक्के शेअर्सनी निफ्टी सूचकांकापेक्षा चांगली कामगिरी केली आहे. ब्रोकरेज फर्मनं म्हटलं आहे की, हा कल कायम राहण्याची शक्यता आहे. विशेषतः जर सध्याचं सरकार मजबूत बहुमताने परत सत्तेत आलं तर जास्त फायदा होईल.
advertisement
या 54 स्टॉक्समध्ये एल अँड टी, एनटीपीसी, एनएचपीसी, पीएफसी, ओएनजीसी, आयजीएल आणि महानगर गॅस हे सर्वात प्रबळ आहेत. सीएलएसएनं म्हटले आहे की, मार्केटमध्ये सध्या सुरू असलेली तेजी जून-जुलैमध्ये संपू शकते. फर्मने अंदाज वर्तवला आहे की, पीएसयू शेअर्समधील वाढ बजेट घोषणेपूर्वी जून किंवा जुलैपर्यंत सुरू राहू शकते.
'या' बँकिंग स्टॉक्सवर ठेवा लक्ष
सीएलएसएच्या मते, 2025 या आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धात, बँकिंग स्टॉक्स रिस्क आणि रिवॉर्डच्या बाबतीत चांगला परतावा देऊ शकतात. ब्रोकरेज फर्मने गुंतवणुकीसाठी एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, ॲक्सिस बँक आणि इंडसइंड बँक यांसारख्या बँकांवर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
advertisement
येत्या चार जून रोजी देशात लोकसभा निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर शेअर मार्केटमध्ये मोठे चढ-उतार दिसण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन गुंतवणूकदार गुंतवणूकीचं प्लॅनिंग करत आहेत. काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शहा यांनी देखील याबाबत भाष्य केलं होतं.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञ आणि एक्सपर्टशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं हे जोखिमेचं आहे. विशेषतः F&O सेगमेंटमध्ये ट्रेडिंग खूप जोखिमयुक्त असते. यामुळे इन्व्हेस्टमेंटपूर्वी एखाद्या सर्टिफाइड आर्थिक सल्लागाराचा सल्ला अवश्य घ्या. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 31, 2024 10:16 PM IST
मराठी बातम्या/मनी/
शेअर मार्केटवाल्यांनो, 4 जूनच्या आधी घ्या हे 'मोदी स्टॉक्स', परदेशातील लोकांनी 54 शेअर्सवर लावला डाव!